BMC Hospital : महापालिका रुग्णालयांमधील संक्रमण रोखण्यासाठी सीएसएसडीची स्थापना

640
BMC Hospital : महापालिका रुग्णालयांमधील संक्रमण रोखण्यासाठी सीएसएसडीची स्थापना
  • सचिन धानजी, मुंबई

मुंबई महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमधील साहित्य हे निर्जंतुकीकरण करण्यासाठी आता प्रत्येक रुग्णालयांमध्ये केंद्रीय निर्जंतुकीकरण पुरवठा विभागाची स्थापना केली जाणार याची सुरुवात उपनगरांतील जोगेश्वरीतील बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा रुग्णालय आणि कुपर रुग्णालयांमध्ये होणार आहे. या दोन्ही रुग्णालयांमध्ये सध्या या पुरवठा विभागाचे काम ७० टक्के पूर्ण झाले आहे. त्यामुळे यापूर्वी मानवी हस्तक्षेपाद्वारे येथील साहित्यांचे निर्जंतुकीकरण केले जात असले तरी भविष्यात मानवी हस्तक्षेप टाळून येथील सर्व साहित्यांचे निर्जंतुकीकरण केले जाणार आहे. त्यामुळे भविष्यात या रुग्णालयांमधील संक्रमण आणि दूषित विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यास यश मिळणार आहे. (BMC Hospital)

मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारित असलेल्या केईएम, शीव, नायर, कुपर या प्रमुख रुग्णालयांसह १७ उपनगरीय रुग्णालयांमध्ये असंख्य रुग्णांना रुग्णसेवा पुरविल्या जातात. या रुग्णालयांमध्ये शस्त्रक्रियागार, एनआयसीयू NICU, आयसीयू ICU, आयसीसीयू ICCU, नेत्ररोग विभाग, अपघात विभाग, रेडिओलॉजी, बाह्यरुग्ण विभाग, रुग्णकक्ष, प्रयोगशाळा इत्यादी विभाग कार्यरत असतात. तातडीच्या व आपत्कालीन प्रसंगी या विभागांना निर्जंतुकीकरण केलेल्या साहित्याची वारंवार आवश्यकता असते. या सगळ्या साहित्यांचे निर्जंतुकीकरण वेळेत होण्यासाठी आणि संक्रमण व दूषित विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्रीय निर्जंतुकीकरण पुरवठा विभागाची (CSSD) स्थापना करणे ही काळाची गरज असल्याने महापालिकेने यासाठी पुढाकार घेतला आहे. (BMC Hospital)

(हेही वाचा – State President Post : सर्वच राजकीय पक्षांमध्ये प्रदेशाध्यक्ष बदलाच्या हालचाली)

रुग्णालयांतील रुग्णकक्ष, बाह्यरुग्ण विभाग, इतर विशेष विभाग आणि शस्त्रक्रियागार या सर्व विभागांना दररोज आवश्यकता भासणाऱ्या विविध उपकरणे व साधसामुग्रीच्या निर्जंतुकीकरणाचा अधिकतम भार सीएसएसडी मार्फत उचलण्यात येईल. नियंत्रित वातावरणात, पुरेशा व्यवस्थापकीय व तांत्रिक पर्यवेक्षणाखाली, कमीत कमी खर्चात जैविकदृष्ट्या सुरक्षित निर्जंतुकीकरण करुन केंद्रिय विभागामार्फत अशा उपकरणांचे संकलन, स्वच्छता, जोडणी, निर्जंतुकीकरण, साठा आणि वितरण करुन रुग्णालयांमधील संसर्गदर कमी करणे हे सीएसएसडीचे उद्दिष्ट असल्याचे महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. (BMC Hospital)

महापालिकेने यासाठी चालू अर्थिक वर्षांत केलेल्या तरतुदीनुसार यावर्षांत विलेपार्ले येथील कुपर रुग्णालय अणि जोगेश्वरीतील बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयांमध्ये या सीएसएसडीची स्थापना करण्यात येत असून याचे काम आतापर्यंत ७० टक्के पूर्ण झाले असून भविष्यात नायर रुग्णालयात सीएसएसडीची स्थापना केली जाईल, अशी माहिती यांत्रिक व विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे टप्प्याटप्याने या सीएसएसडीची उभारणी सर्व रुग्णालयांमध्ये केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (BMC Hospital)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.