Boxing Day Test : मेलबर्नमध्ये पहिले दोन दिवस कसं असेल हवामान, खेळपट्टीचा अंदाज काय?

41
Boxing Day Test : मेलबर्नमध्ये पहिले दोन दिवस कसं असेल हवामान, खेळपट्टीचा अंदाज काय?
Boxing Day Test : मेलबर्नमध्ये पहिले दोन दिवस कसं असेल हवामान, खेळपट्टीचा अंदाज काय?
  • ऋजुता लुकतुके

बोर्डर – गावसकर मालिका आता चौथ्या बॉक्सिंग डे कसोटीपर्यंत येऊन ठेपली आहे. मालिकेत सध्या १-१ अशी बरोबरी आहे. त्यामुळे ही कसोटी कोंडी फोडणारी आणि मालिकेत महत्त्वपूर्ण आघाडी मिळवून देणारी असू शकते. दोन्ही संघांना या कसोटीचं महत्त्व माहीत आहे. आणि चांगली सुरुवात हे पुढील वाटचालीचं गमक असणार आहे. कसोटीला सुरुवात झाली आहे. आता बघूया पहिले दोन दिवस मेलबर्नमध्ये हवामान नेमकं कसं असेल आणि त्याचा खेळपट्टीवर काय परिणाम जाणवेल. (Boxing Day Test)

(हेही वाचा- Vishwa Marathi Sammelan : दुसरे विश्व मराठी संमेलन फेब्रुवारीच्या अखेरीस पुण्यात)

मेलबर्नमधील गरमी या मालिकेतील कडाका वाढवणारी ठरू शकेल. कारण, २६ आणि २७ डिसेंबर या दोन्ही दिवशी दुपारपर्यंत मेलबर्नमध्ये कडक उकाडा असेल आणि तापमान ४४ अंश सेल्सिअसपर्यंत वर चढू शकेल असा अंदाज ॲक्युचेक या हवामानविषयक वेबसाईटने दिला आहे. ‘भरपूर वारे, भरपूर उकाडा आणि दाट ढगांचं आवरण,’ असं वर्णन या हवामानाचं वेबसाईटने केलंय. तीव्र उकाडा उन्हात फिरणाऱ्यांना हानीकारक ठरू शकतो, असा इशाराही ॲक्युवेदरने दिला आहे. (Boxing Day Test)

Untitled design 59

पण, त्याचवेळी कोरडे वारेही वाहताना दिसतील. आणि संध्याकाळच्या सुमारास तापमान अगदी २० अंश सेल्सिअसपर्यंत खाली येऊ शकेल. हवामानात उकाडा असेल तर खेळपट्टीला लवकर भेगा पडू शकतात. त्यामुळे खेळपट्टी गोलंदाजांना मदत करणारी ठरू शकते. ‘खेळपट्टीवर गवत आहे. त्यामुळे चेंडूला सुरुवातीला उसळी मिळेल. पण, चेंडू जुना झाल्यावर तो कडक राहणार नाही. आणि अशावेळी फलंदाज धावाही करू शकतील. त्यामुळे गोलंदाज आणि फलंदाज अशा दोघांना मदत करणारी, त्याचवेळी दोघांचा कस पाहणारी खेळपट्टी असेल,’ असं क्युरेटर मॅट पेज यांनी म्हटलं आहे. (Boxing Day Test)

जसजसे दिवस पुढे जातील तसं फलंदाजी करणं सोपं राहणार नाही. आणि उकाडा तसंच खेळपट्टीवरील भेगांमुळे तेज गोलंदाजांना सलग गोलंदाजी करणं शक्य होणार नाही. हा सगळा विचार करता मेलबर्न कसोटी गोलंदाज आणि फलंदाज अशा दोघांसाठी आव्हानात्मक आणि त्याचबरोबर जम बसल्यावर सोपीही असेल. (Boxing Day Test)

(हेही वाचा- वाहतुकीची समस्या, रस्त्यांच्या कामावर लक्ष केंद्रीत करा; DCM Ajit Pawar यांनी पालिका प्रशासनाला दिली सूचना)

ही मालिका मात्र आता दोन्ही संघांसाठी आव्हानात्मक बनली आहे. कारण, आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दृष्टीने दोन्ही संघांसाठी महत्त्वाची आहे. मालिका जिंकून अंतिम फेरीत थेट प्रवेश करण्याची संधी दोन्ही संघांना आहे. (Boxing Day Test)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.