Boxing Day Test : मेलबर्न कसोटीत जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा यांना खुणावतोय हा मापदंड 

Boxing Day Test : बुमराला बळींचं द्विशतक करण्यासाठी ६ गडी बाद करायचे आहेत

41
Boxing Day Test : मेलबर्न कसोटीत जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा यांना खुणावतोय हा मापदंड 
Boxing Day Test : मेलबर्न कसोटीत जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा यांना खुणावतोय हा मापदंड 
  • ऋजुता लुकतुके

भारतीय संघातील दोन मुख्य गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा वैयक्तिक मोठ्या मापदंडांच्या जवळ आहेत. जसप्रीत बुमराहला कसोटीत २०० बळी पूर्ण करण्यासाठी अजून ६ बळी हवे आहेत. तर रवींद्र जडेजाला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६०० बळी पूर्ण करण्यासाठी तितकेच म्हणजे ६ बळी हवे आहेत. (Boxing Day Test)

(हेही वाचा- Vishwa Marathi Sammelan : दुसरे विश्व मराठी संमेलन फेब्रुवारीच्या अखेरीस पुण्यात)

आंतरराष्ट्रीय कसोटींत २०० बळी पूर्ण करणारा बुमराह फक्त बारावा भारतीय गोलंदाज असेल. त्याच्या नावावर सध्या ४३ कसोटी सामन्यांमध्ये १९ धावांच्या सरासरीने १९४ बळी आहेत. त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे २७ धावांत ६ बळी. आणि डावांत ५ बळी टिपण्याची कामगिरी त्याने १२ वेळा केली आहे. या मालिकेतही बुमराह भन्नाट फॉर्ममध्ये आहे. आणि पहिल्या ३ कसोटींत त्याने १०.९० धावांच्या अप्रतिम सरासरीने २१ बळी मिळवले आहेत. ७६ धावांत ६ बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. आणि डावांत ५ बळी त्याने दोनदा मिळवले आहेत. मालिकेतील आतापर्यंतचा तो सर्वोत्तम गोलंदाज ठरला आहे. (Boxing Day Test)

 तर ऑस्ट्रेलिया विरुद्धही तो भारताचा सर्वोत्तम गोलंदाज आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या ऑस्ट्रेलियातील १० कसोटींत १७.१५ च्या सरासरीने त्याने ५३ बळी मिळवले आहेत. डावांत ५ बळी टिपण्याची कामगिरी त्याने तीनदा केली आहे. आणि त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे ३३ धावांत ७ बळी. (Boxing Day Test)

(हेही वाचा- वाहतुकीची समस्या, रस्त्यांच्या कामावर लक्ष केंद्रीत करा; DCM Ajit Pawar यांनी पालिका प्रशासनाला दिली सूचना)

दुसरीकडे, रवींद्र जडेजा ६०० आंतरराष्ट्रीय बळी मिळवण्यापासून ७ बळी दूर आहे. अशी कामगिरी करणारा तो फक्त पाचवा गोलंदाज असेल. आतापर्यंत ३४९ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याने २९ धावांच्या सरासरीने ५९३ बळी मिळवले आहेत. आणि १७ वेळा डावांत ५ बळी टिपण्याची कामगिरी केली आहे. त्याची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी आहे ४२ धावांत ७ बळी. (Boxing Day Test)

ऑस्ट्रेलियाविरुद्ध जडेजाची कामगिरी अव्वल राहिली आहे. आतापर्यंत १८ कसोटींत त्याने २० धावांच्या सरासरीने तब्बल ८९ बळी मिळवले आहेत. त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे ती ४२ धावांत ७ बळींची. आणि कसोटीत १० बळी घेण्याची कामगिरी त्याने एकदा केली आहे. आणि पाचवेळी डावांत ५ बळी मिळवले आहेत. (Boxing Day Test)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.