Kalyan Minor Girl Murder Case प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलीस आयुक्तांना महत्त्वाचे निर्देश

101
Kalyan Minor Girl Murder Case प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलीस आयुक्तांना महत्त्वाचे निर्देश
Kalyan Minor Girl Murder Case प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलीस आयुक्तांना महत्त्वाचे निर्देश

कल्याण (Kalyan Minor Girl Murder Case) नजीकच्या बापगाव परिसरामध्ये १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळून आला होता. या मुलीवर लैंगिक अत्याचार (Kalyan Crime) करून तिची हत्या करण्यात आली होती. हत्या करणारा नराधम विशाल गवळी (Vishal Gawli) याला बुलढाण्यातील शेगाव येथे अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता पुढील तपासासाठी त्याला कल्याण पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी याप्रकरणाची गंभीर दखल घेत ठाणे पोलीस आयुक्तांशी फोनवरुन चर्चा केली आहे. (Kalyan Minor Girl Murder Case)

हेही वाचा-EWS Certificate : ‘ईडब्ल्यूएस’ प्रमाणपत्रासाठी दोन महिने मुदतवाढ

कल्याणमधील घटना गंभीर आहे. विकृतांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे. आरोपीला अटक झाली, हा खटला जलदगती न्यायालयात चालवा. आरोपीला फाशी होईल, हे सुनिश्चित करा. असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस आयुक्तांना दिले आहेत. त्यामुळे आता विशाल गवळी याच्यावर पोलिसांकडून झटपट कारवाई होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. (Kalyan Minor Girl Murder Case)

हेही वाचा-Boxing Day Test : मेलबर्नमध्ये पहिले दोन दिवस कसं असेल हवामान, खेळपट्टीचा अंदाज काय?

मंगळवारी सकाळी कल्याण-पडघा रस्त्यावरील बापगाव येथे संबंधित मुलीचा मृतदेह सापडला होता. वैद्यकीय तपासणीत तिच्यावर बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले होते. यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून कारवाईला सुरुवात केली होती. त्यावेळी विशाल, त्याची बँकर पत्नी साक्षी यांनी रिक्षातून संबंधित मुलीचा मृतदेह बापगाव येथे आणून फेकल्याचे निदर्शनास आले होते. त्यानंतर पोलिसांनी साक्षी गवळी हिच्यासह अनेकांना ताब्यात घेऊन चौकशीला सुरुवात केली होती. त्यावेळी विशाल गवळी हा त्याच्या पत्नीच्या माहेरी म्हणजे शेगावला जाऊन लपल्याची माहिती समोर आली होती. यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला शेगावमध्ये जाऊन बेड्या ठोकल्या होत्या. (Kalyan Minor Girl Murder Case)

हेही वाचा-वाहतुकीची समस्या, रस्त्यांच्या कामावर लक्ष केंद्रीत करा; DCM Ajit Pawar यांनी पालिका प्रशासनाला दिली सूचना

भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ आज (२६ डिसेंबर) कल्याण कोळशेवाडी पोलीस ठाण्यात डीसीपींची भेट घेण्यासाठी येणार आहेत. आरोपी विशाल गवळी याने यापूर्वीही महिलांवर बलात्काराचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्याची नोंद आहे. त्याच्या दहशतीमुळे अनेक स्थानिक नागरिकांनी घाबरुन परिसर सोडल्याची माहिती समोर आली आहे. (Kalyan Minor Girl Murder Case)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.