ED Raid On Canada Colleges : ईडीची आठ ठिकाणी छापेमारी; कॅनडातील २६० महाविद्यालयांचा मानवी तस्करीशी संबंध

88
ED Raid On Canada Colleges : ईडीची आठ ठिकाणी छापेमारी; कॅनडातील २६० महाविद्यालयांचा मानवी तस्करीशी संबंध
ED Raid On Canada Colleges : ईडीची आठ ठिकाणी छापेमारी; कॅनडातील २६० महाविद्यालयांचा मानवी तस्करीशी संबंध

काही दिवसांपूर्वी कॅनडात (ED Raid On Canada Colleges) एकामागे एक तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर आता कॅनडामध्ये (Canada) भारतीयांबाबत धक्कादायक बाब समोर आली आहे. कॅनडाच्या सीमेवरुन भारतीय नागरिकांची अमेरिकेत तस्करी करण्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाची ईडीकडून चौकशी सुरू आहे. या प्रकरणात काही कॅनेडियन कॉलेज आणि भारतीय संस्थांचा सहभाग असल्याचा आरोप आहे. (ED Raid On Canada Colleges)

हेही वाचा-Kalyan Minor Girl Murder Case प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलीस आयुक्तांना महत्त्वाचे निर्देश

गुजरातमधील (Gujarat) डिंगुचा गावातील चार जणांच्या मृत्यूनंतर ही चौकशी करण्यात येत आहे. या चौघांचा ( जगदीश पटेल (वय ३९), पत्नी वैशाली (३५), मुलगी (११) आणि मुलगा (३)) १९ जानेवारी २०२२ रोजी बेकायदेशीरपणे सीमा ओलांडण्याचा प्रयत्न करताना कडाक्याच्या थंडीमुळे मृत्यू झाला होता. मानवी तस्करी करणार्‍यांनी या कुटुंबाला उणे ३७ अंश सेल्सिअस तापमानात हिमवादळत सोडून दिले होते. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, अहमदाबाद पोलिसांकडे दाखल करण्यात आलेल्या भावेश अशोकभाई पटेल आणि इतरांविरुद्ध एफआयआरची दखल घेतल्यानंतर ईडीने आपला तपास सुरू केला. बेकायदेशीर मार्गाने भारतीय नागरिकांची कॅनडामार्गे अमेरिकेत तस्करी करण्याचा कट रचल्याचा पटेल यांच्यावर आरोप आहे. मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या फौजदारी तरतुदीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (ED Raid On Canada Colleges)

हेही वाचा- ED ला आरोपींचा मोबाइल किंवा लॅपटॉप डेटा तपासण्यास Supreme Court कडून बंदी

ईडीने दिलेल्या माहितीनुसार, तस्करी नेटवर्कमधून आरोपींनी कॅनडातील कॉलेज आणि विद्यापीठांमध्ये व्यक्तींना प्रवेश मिळवून देण्यास मदत केली. या लोकांनी कॅनडा स्टुडंट व्हिसासाठी अर्ज केला होता, पण कॅनडाला पोहोचल्यावर ते तिथल्या कॉलेजमध्ये गेले नाहीत. त्याऐवजी, त्यांनी बेकायदेशीरपणे सीमा ओलांडली आणि अमेरिकेत प्रवेश केला. या कॅनेडियन कॉलेजला भरलेली फी या लोकांच्या खात्यात परत पाठवण्यात आल्याचा आरोप ईडीने केला आहे, त्यामुळेच कॉलेजमधील लोकांसोबत यांचा संबंध असल्याचा संशय निर्माण झाला आहे. (ED Raid On Canada Colleges)

हेही वाचा-EWS Certificate : ‘ईडब्ल्यूएस’ प्रमाणपत्रासाठी दोन महिने मुदतवाढ

या रॅकेटद्वारे अमेरिकेत एन्ट्री करू इच्छिणाऱ्या भारतीय नागरिकांकडून ५५ ते ६० लाख घेतले जात असल्याचा आरोप आहे. ईडीने या चौकशीत १० आणि १९ सप्टेंबर रोजी मुंबई, नागपूर, वडोदरा आणि गांधीनगर अशा विविध आठ ठिकाणी झडती घेतली. यात दोन संस्थांबाबत माहिती मिळाली. त्यापैकी एक मुंबईत आणि एक नागपुरात होतं. या संस्थांचं कमीशनच्या आधारे विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून देण्यासाठी परदेशातील कॉलेजसोबत करार केला होता. (ED Raid On Canada Colleges)

एक संस्था जवळपास २५ हजार विद्यार्थ्यांना विदेशात कॉलेजमध्ये पाठवत असून दुसरी संस्था १० हजार विद्यार्थ्यांना पाठवते. ईडीने दिलेल्या माहितीनुसार, कॅनेडियन कॉलेजने एका युनिटशी टाय-अप केलं होतं, तर दुसरं युनिट १५० हून अधिक कॉलेजशी जोडलेलं होतं. आता ईडीला कॅनडा-अमेरिका सीमेजवळ असलेल्या काही संस्थांचा मानवी तस्करीच्या प्रकरणात थेट सहभाग असू शकतो असा संशय आहे. याच्या झडतीदरम्यान, ईडीने बँकेत जमा असलेले १९ लाख रुपये फ्रिज केले असून दोन वाहनं जप्त केली आहेत. तसंच काही कागदपत्रं आणि डिजिटल उपकरणंही जप्त केली आहेत. (ED Raid On Canada Colleges)

ईडीची आठ ठिकाणी छापेमारी
ईडीने १० डिसेंबर आणि १९ डिसेंबर रोडी मुंबई, नागपूर, गांधीनगर आणि वडोदरा येथील आठ ठिकाणी कॅनडामधील महाविद्यालयांद्वारे बेकायदेशीर स्थलांतरितांना पाठवणाऱ्या एजंट्सच्या ठिकाणांवर छापे टाकले. या दरम्यान ईडीला धक्कादायक माहिती मिळाली आहे. ईडीने बुधवारी सांगले की, “या तपासादरम्यान असे दिसून आले की, मुंबई आणि नागपूर येथील फक्त दोन एजंट्सनी दरवर्षी जवळपास ३५,००० बेकायदेशीर स्थलांतरींना परदेशात पाठवले आहे.” (ED Raid On Canada Colleges)

या रॅकेटमध्ये गुजरातमधील सुमारे १,७०० एजंट आणि भारतभरात सुमारे ३,५०० जण सहभागी असल्याचेही तपासात आढळून आले आहे. ईडीचा अंदाज आहे की ८०० हून अधिक एजंट त्यांच्यावर अनेक यंत्रणांनी कारवाई करूनही अजूनही सक्रिय आहेत. (ED Raid On Canada Colleges)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.