Maharashtra Growth Story Conclave पर्व ४ संपन्न; मान्यवरांनी दिले उद्योजकतेचे धडे

69
Maharashtra Growth Story Conclave पर्व ४ संपन्न; मान्यवरांनी दिले उद्योजकतेचे धडे
Maharashtra Growth Story Conclave पर्व ४ संपन्न; मान्यवरांनी दिले उद्योजकतेचे धडे

महाराष्ट्र ग्रोथ स्टोरी कॉन्क्लेव्ह (Maharashtra Growth Story Conclave) हा एक राज्य म्हणून महाराष्ट्राच्या प्रगती आणि विकासावर चर्चा करण्यासाठी अर्थसंकेतने रचना आर्टस् अँड क्रिएशन्सच्या सहयोगाने उद्योजकीय कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून येस बँकेचे मुंबई उपाध्यक्ष दीपक शर्मा, अर्थसंकेतचे संस्थपाक डॉ अमित बागवे, रचना आर्टस् अँड क्रिएशन्सच्या रचना लचके बागवे, तसेच विशेष अतिथी म्हणून सॅटर्डे क्लबच्या सल्लागार मानसी मांजरेकर, जेष्ठ उद्योजक चंद्रहास राहटे, डिजिटल कोच जोतिराम सपकाळ, पायोनियर वेल्थ सोल्युशन्सचे वैभव शेटे, डिव्हाईन हेल्थकेअरचे वैभव बागवे व बिझनेस कोच रोहित सोलकर उपस्थित होते.

या वेळी अर्थसंकेत (Arthsanket) ‘युवा उद्योजक’ पुरस्काराने संकेत खाडे, तसेच ‘बिझनेझ अचिव्हर्स’ पुरस्काराने मकरंद शेरकर, जॉय मसिह, दीपिका जैन, ‘इन्व्हेस्टर अचिव्हर्स’ पुरस्काराने संजय काठोळे व अलका काठोळे यांचा सत्कार करण्यात आला.

(हेही वाचा – Arjun Tendulkar : अर्जुन तेंडुलकरने गाठला ५० बळींचा टप्पा)

अशी झाली कॉन्क्लेव्ह 

प्रास्ताविक करताना अर्थसंकेतचे संस्थापक डॉ. अमित बागवे यांनी महाराष्ट्र नावाचा एक हजारहून अधिक वर्ष जुना संदर्भ दिला. तसेच मराठी माणूस उद्योजकतेमध्ये पुढे जावा, यासाठी अर्थसंकेत नेहमीच प्रयत्नशील राहील, असे सांगितले. डिजिटल कोच जोतिराम सपकाळ यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वापरून व्यवसाय अनेक पटीने कसा वाढवावा, यावर सुरेख मार्गदर्शन केले.

मानसी मांजरेकर यांनी बिझनेस नेटवर्किंगचे धडे उपस्थितांना दिले, तर चंद्रहास रहाटे यांनी गुंतवणुकीचे महत्त्व सोदाहरण पटवून दिले. वैभव बागवे यांनी डिव्हाईन हेल्थकेअर तर्फे चालविण्यात येत असलेल्या स्वस्त आरोग्यसेवांबद्दल माहिती दिली तर वैभव शेटे यांनी शेअर मार्केट मधून संपत्ती कशी निर्माण करावी याबद्दल मार्गदर्शन केले. रचना आर्टस् अँड क्रिएशन्सच्या रचना लचके बागवे यांनी आभार प्रदर्शन केले व मंदार नार्वेकर यांनी उत्तम सूत्रसंचालन केले.

बांधकाम, पायाभूत सुविधा, आयटी आणि उत्पादन ते कृषी आणि पर्यटन यांसारख्या उद्योगांच्या दोलायमान मिश्रणासह, महाराष्ट्राने गेल्या काही वर्षांत उल्लेखनीय वाढ दर्शविली आहे. या यशात योगदान देणारे घटक जसे की, सरकारी उपक्रम, पायाभूत सुविधांचा विकास आणि गुंतवणुकीच्या संधी, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी शेअर बाजारातून भांडवल उभारणे हे या परिषदेचे उद्दिष्ट होते. पुढील सहयोग आणि भविष्यातील वाढीच्या पुढाकारांसाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देत भारताच्या अर्थव्यवस्थेतील एक पॉवरहाऊस बनण्याच्या दिशेने महाराष्ट्राचा प्रवास हा कॉन्क्लेव्ह साजरा करत आहे.

महाराष्ट्र ग्रोथ स्टोरी कॉनक्लेव्ह (Maharashtra Growth Story Conclave) हा कार्यक्रम महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये होणार असून अधिक माहितीसाठी (संपर्क – 8082349822) संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.