Gujrat Accident : गुजरातमध्ये टायर फुटून दोन ट्रकची समोरासमोर धडक, स्फोटात 2 ठार, 3 जखमी

63
Gujrat Accident : गुजरातमध्ये टायर फुटून दोन ट्रकची समोरासमोर धडक, स्फोटात 2 ठार, 3 जखमी
Gujrat Accident : गुजरातमध्ये टायर फुटून दोन ट्रकची समोरासमोर धडक, स्फोटात 2 ठार, 3 जखमी

गुजरातमधील (Gujrat Accident) अहमदाबाद-राजकोट महामार्गावर (Ahmedabad-Rajkot Highway) बुधवारी (२५ डिसेंबर) रात्री उशिरा दोन ट्रकची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला, तर तीन जण जखमी झाले आहेत. बागोदराहून बावळ्याकडे कपड्याने भरलेल्या ट्रकचा टायर फुटल्याने हा अपघात झाला. हा ट्रक दुसऱ्या बाजूने येणाऱ्या ट्रकला धडकला. ज्यानंतर स्फोट झाला. दोन्ही ट्रकने पेट घेतला. जवळून जाणाऱ्या दोन वाहनांनाही त्याची धडक बसली. (Gujrat Accident)

हेही वाचा-IRCTC ची वेबसाईट अन् ॲप डाऊन; आयआरसीटीसीनं सांगितलं नेमकं कारणं …

कपड्यांनी भरलेला ट्रक चोटीलाहून अहमदाबादकडे जात होता. त्याचा टायर फुटून बावळ्याहून बागोद्राकडे जाणाऱ्या ट्रकला धडकला. हा ट्रक गहू आणि तांदळाच्या पोत्याने भरला होता. (Gujrat Accident)

हेही वाचा-Boxing Day Test : भारताचे माजी प्रशिक्षक सांगतायत मेलबर्न कसोटी जिंकण्याचं गमक

कपड्यांनी भरलेला ट्रक रणछोडभाई रबारी यांच्या कंपनीचा होता. ट्रकचे जुने चालक प्रदीपभाई हे रजेवर गेले होते. त्यांच्या जागी कमलभाई गाडी चालवत होते. या अपघातात चालक कमलभाई यांचा मृत्यू झाला आहे, तर अन्य एका प्रवाशाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. (Gujrat Accident)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.