Cricket News : अर्जुन तेंडुलकरने गाठला ५० बळींचा टप्पा

Arjun Tendulkar : अर्जुन सध्या गोव्याकडून विजय हजारे स्पर्धा खेळत आहे

104
Cricket News : अर्जुन तेंडुलकरने गाठला ५० बळींचा टप्पा
Cricket News : अर्जुन तेंडुलकरने गाठला ५० बळींचा टप्पा
  • ऋजुता लुकतुके

भारताचा दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकरचा मुलगा आणि डावखुरा तेज गोलंदाज अर्जुन तेंडुलकरने देशांतर्गत क्रिकेट खेळताना वैयक्तिक मापदंड सर केला आहे. विजय हजारे चषकात त्याने पांढऱ्या चेंडूंवर आपले ५० बळी पूर्ण केले आहेत. तो सध्या गोव्याकडून विजय हजारे चषक स्पर्धा खेळत आहे. हरयाणा विरुद्धच्या सामन्यात अर्जुनला एकही बळी मिळाला नव्हता. पण, ही कसर ओडिशाविरुद्ध भरून काढताना त्याने डावांत ३ बळी मिळवले. आणि त्याचबरोबर वैयक्तिक ५० बळी पूर्ण केले. (Cricket News)

(हेही वाचा- Boxing Day Test : भारताचे माजी प्रशिक्षक सांगतायत मेलबर्न कसोटी जिंकण्याचं गमक)

२०२१ मध्ये मुंबईकडून अर्जुन आपली पहिला पहिला टी-२० सामना खेळला होता. त्यानंतर प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये ४१ सामन्यांत त्याने ५१ बळी मिळवले आहेत. लिस्ट ए सामन्यांत त्याने १७ सामन्यांत २४ बळी तर २४ टी-२० सामन्यांत २७ बळी मिळवले आहेत. या हंगामापासून अर्जुन गोव्याकडून देशांतर्गत क्रिकेट खेळत आहे. तर आयपीएलमध्ये २०२५ च्या हंगामासाठी मुंबई इंडियन्सनी त्याला करारबद्ध केलं आहे. (Cricket News)

मुंबईकडून अर्जुन आधी १९ वर्षांखालील संघात खेळत होता. आणि २०२०-२१ च्या हंगामात तो ज्येष्ठ गटात पोहोचला. रणजी करंडकात एकूण १७ सामन्यांमध्ये अर्जुनने ३७ बळी आणि ५३६ धावा केल्या आहेत. अर्जुन आणि त्याचे वडील सचिन तेंडुलकर यांची क्रिकेटची शैली पूर्णपणे वेगळी आहे. अर्जुन डाव्या हाताने खेळतो. त्याचे वडील फलंदाज असण्याबरोबरच फिरकी गोलंदाजी करायचे. अर्जुन डावखुरा तेज गोलंदाज आहे. (Cricket News)

(हेही वाचा- IRCTC ची वेबसाईट अन् ॲप डाऊन; आयआरसीटीसीनं सांगितलं नेमकं कारणं …)

सचिन तेंडुलकरने आपल्या प्रथमश्रेणी कारकीर्दीत ३१६ सामन्यांमध्ये ७१ बळी मिळवले होते. तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये दोनदा डावांत ५ बळी मिळवण्याची कामगरी केली होती. पांढरा चेंडू घेऊन खेळताना सचिन तेंडुलकरने एकूण २०१ प्रथमश्रेणी बळी मिळवले. (Cricket News)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.