भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (J. P. Nadda) यांच्या निवासस्थानी एनडीएतील (NDA) प्रमुख नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला एनडीएमधील मित्रपक्षांच्या नेत्यांसोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) हेही उपस्थित होते. एनडीएतील घटक पक्षांमध्ये उत्तम समन्वय राखण्याच्या दृष्टीने यावेळी विचारविनिमय करण्यात आल्याचे समजते.
या बैठकीला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (J. P. Nadda) यांच्यासह गृहमंत्री अमित शाह, तेलुगू देसमचे अध्यक्ष चंद्रबाबू नायडू, शिवसेनेचे नेते प्रतापराव जाधव, जेडीयूचे नेते ललन सिंह, जेडीएसचे नेते एच. डी. कुमारस्वामी, निषाद पार्टीचे संजय निषाद, हम पार्टीचे जीतनराम मांझी, अपना दलाच्या अनुप्रिया पटेल यांच्यासह एनडीएचे (NDA) इतर नेते उपस्थित होते.
(हेही वाचा – Gujrat Accident : गुजरातमध्ये टायर फुटून दोन ट्रकची समोरासमोर धडक, स्फोटात 2 ठार, 3 जखमी)
एनडीएतील प्रमुख नेत्यांमध्ये महत्त्वाची चर्चा
बैठकीला उपस्थित राहण्यासाठी एनडीएमधील (NDA) मित्रपक्ष असलेल्या भारत धर्मजनसेना पक्षाचे नेते तुषार वेल्लापल्ली (Thushar Vellappally) यांनी देखील हजेरी लावली होती. या बैठकीमध्ये सुरुवातीला हरियाणा, महाराष्ट्र विधानसभा आणि उत्तर प्रदेशमधील पोटनिवडणुकीत एनडीएला मिळालेल्या यशाबद्दल अभिनंदन करण्यात आले. त्यानंतर वन नेशन, वन इलेक्शन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अवमानाचा मुद्दा, तसेच इतर मुद्यांवर चर्चा करण्यात आल्याची प्राथमिक माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, एनडीएच्या आधीच्या बैठकीमध्ये एनडीएचे सर्व नेते महिन्यातून एकदा बैठक घेतील, असे निश्चित झाले होते. मात्र हरियाणा, महाराष्ट्र आणि झारखंडमधील विधानसभा निवडणुकीच्या व्यस्ततेमुळे ही बैठक होऊ शकली नव्हती.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community