Arunish Chawla यांची महसूल सचिवपदी नियुक्ती; अर्थसंकल्पाच्या ५ आठवडे आधी प्रशासकीय फेरबदल

70
Arunish Chawla यांची महसूल सचिवपदी नियुक्ती; अर्थसंकल्पाच्या ५ आठवडे आधी प्रशासकीय फेरबदल
Arunish Chawla यांची महसूल सचिवपदी नियुक्ती; अर्थसंकल्पाच्या ५ आठवडे आधी प्रशासकीय फेरबदल

अर्थसंकल्पाच्या ५ आठवड्यांपूर्वी केंद्र सरकारने दि. २५ डिसेंबर रोजी कार्मिक मंत्रालयात प्रशासकीय फेरबदल केले आहेत. बिहार केडरचे १९९२ बॅचचे आयएएस अधिकारी अरुणीश चावला (Arunish Chawla) यांची महसूल सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

( हेही वाचा : I.N.D.I Aghadi मध्ये फुट; काँग्रेसला आघाडीतून बाहेर काढण्यासाठी ‘आप’च्या हालचाली

संजय मल्होत्रा यांची डिसेंबरमध्ये रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी नियुक्ती झाल्यानंतर महसूल सचिवाचे पद रिक्त झाले होते. चावला (Arunish Chawla) सध्या फार्मास्युटिकल्स सचिव आहेत. आधार प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित अग्रवाल चावला (Amit Agarwal Chawla) यांच्या जागी फार्मास्युटिकस्ल सचिव म्हणून नियुक्ती करतील. (Arunish Chawla)

या अधिकाऱ्यांचे विभागही बदलले

– मणिपूरचे मुख्य सचिव विनीत जोशी (Vineet Joshi) यांना उच्च शिक्षण सचिव बनवण्यात आले आहे. ते १९९२ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.

– सध्या वस्त्रोद्योग सचिव रचना शाह (Rachna Shah) यांची कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

– माहिती आणि प्रसारण मंत्रालयातील विशेष सचिव नीरजा शेखर यांना राष्ट्रीय उत्पादकता परिषदेचे महासंचालक बनवण्यात आले आहे.

कोण आहेत अरुणीश चावला?

अरुणीश चावला हे १९९२च्या बॅचचे बिहार कॅडरचे IAS आहेत. चावला दि. १ नोव्हेंबर २०२३ पासून महसूल सचिवपदी नियुक्ती होईपर्यंत फार्मास्युटिकल्स सचिव म्हणून कार्यरत होते. चावला यांनी नियोजन आणि विकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून काम पाहिले आहे. ते बिहार राज्य नियोजन मंडळाचे सचिव आणि बिहार आपत्ती पुनर्वसन आणि पुनर्रचना सोसायटीचे प्रकल्प संचालक देखील राहिले आहेत.

हेही पाहा :

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.