Raosaheb Danve यांचा रोख कुणाकडे? म्हणाले, ‘ते’, ‘ठाकरे पिता-पुत्रांमध्ये देखील भांडण लावतील’

160
बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख (Sarpanch Santosh Deshmukh murder case) यांच्या हत्येसंबंधी मंत्री धनंजय मुंडे (Minister Dhananjay Munde resigns) आणि त्यांच्या पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांच्या राजीनाम्याची मागणी उबाठा गटाचे संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली. खासदार राऊतांच्या या मागणीवर भाजपाचे रावसाहेब दानवे यांनी राऊतांवर हल्लाबोल करत पलटवार केला आहे. (Raosaheb Danve)
उबाठाचे जेष्ठ नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी धनंजय मुंडे आणि अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. यावर, ते आमच्या पक्षाचे पदाधिकारी आहेत का, राजीनामा मागायला, असा खोचक सवाल उपस्थित केला. यावेळी बोलताना दानवे यांनी ईव्हीएमबाबत भाष्य करत विरोधकांवर टीका केली आहे. ते म्हणाले, त्यांनी कर्नाटक आणि हरयाणा जिंकली. लोकसभेत आमचा पराभव झाला त्यावर त्यांनी ऑब्जेक्शन घेतले नाही. आता विरोधकांकडून आपल्या पक्षातील कार्यकर्ते थोपवण्यासाठी ईव्हीएमवर दोष (EVM Defect) दिला जात असल्याची टीका दानवे यांनी केली आहे.

(हेही वाचा – एनडीएतील प्रमुख नेत्यांमध्ये खलबतं; भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष J. P. Nadda यांच्या घरी बैठक)

रावसाहेब दानवे म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये राज्य पातळीवरील सर्वच पक्षांनी कधी कधी स्थानिक पातळीवरती निर्णय घेण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यामुळं वरच्या सूचना जशा येतील तशा सूचना पाळणाऱ्यांपैकी आम्ही आहोत. संतोष देशमुख हत्या प्रकरणी बोलताना दानवे म्हणाले, संतोष देशमुख यांच्या हत्येचे मी समर्थन करत नाही. जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्याचे काम सरकार करेल. प्रकरण आता सीबीआयकडे गेले आहे. या प्रकरणात दोषी असलेल्यांना पकडून सरकार त्यांना शिक्षा देईल याची मला खात्री असल्याचे दानवे म्हणाले.

(हेही वाचा – एनडीएतील प्रमुख नेत्यांमध्ये खलबतं; भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष J. P. Nadda यांच्या घरी बैठक)

पक्षाचा आदेश नाही

दरम्यान, बीड (Beed Murder Case) येथे गुन्हेगारीच्या विरोधात मोर्चा काढण्यात येणार आहे. यावर दानवे म्हणाले, जो एखाद्या भागाचे प्रतिनिधित्व करतो त्याला आपल्या वेदना बोलून दाखवण्याचा अधिकार आहे. बीडच्या मोर्चात जाण्यासाठी आम्ही कोणाला थांबवले नाही. सहभाग घेऊ नका म्हणून पक्षाचा काही असा आदेश नाही.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.