महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde) यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची 7 लोक कल्याण मार्ग येथील त्यांच्या शासकीय निवासस्थानी सहकुटुंब सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांचा मुलगा लोकसभा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (MP Shrikant Shinde) आणि स्नुषा वृषाली शिंदे उपस्थित होते. उपमुख्यमंत्री शिेंदे यांनी पंतप्रधानांना पारंपारिक पैठणी शेला भेट म्हणून प्रदान केला. मात्र या भेटीनंतर राजधानीतील राजकीय वर्तुळात भेटीची चर्चा चांगलीच रंगली आहे.
पंतप्रधानांच्या भेटीनंतर शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत, “ही सदिच्छा भेट असल्याचे स्पष्ट केले. तसेच या भेटीत शिंदे यांनी विकसित भारताच्या वाटचालीत राज्याचा योगदानाबाबत मोदी यांच्याशी चर्चा केल्याचे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनीही महाराष्ट्राच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून सर्वोत्तपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले असल्याचे त्यांनी योवळी सांगितले.
(हेही वाचा – Vishva Hindu Parishad : मंदिरांना सरकारच्या नियंत्रणातून मुक्त करण्याची मागणी)
कल्याण घटनेवर बोलताना एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde) म्हणाले, घडलेली घटना अत्यंत दुःखद आहे, वेदनादायी आहे, माणुसकीला काळिमा फासणारी आहे. कालच श्रीकांत शिंदे यांनी पीडित कुटुंबियांची भेट घेतली आहे. त्यांना दिलासा दिला आहे. आमच्या परिवारातीलच घटना आहे असे समजून आम्ही या घटनेला सरकारने गांभीर्याने घेतले आहे. यामध्ये जो दोषी आहे, आरोपी आहे, त्यांना शिक्षा होणारच. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde) म्हणाले, “डबल इंजिन सरकार ज्या पद्धतीने काम करत होतं, अनेक योजनांमध्ये केंद्राचे सहकार्य होतं. त्यामुळे अडीच वर्षात आम्ही खूप काम करू शकलो. मला याचं समाधान आहे की, अडीच वर्षात… कमी कालावधीत खूप मोठ्या काळात होईल असं काम केलं. त्याची पोचपावती आम्हाला मिळाली आणि म्हणून सदिच्छा भेट पंतप्रधान मोदीजींची (PM Narendra Modi) घेतली. मोदीजींनी सांगितलं की, महाराष्ट्राच्या विकासात कुठेही काही कमी पडणार नाही.”
या दौ-या दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde) यांनी नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आणि केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा (J. P. Nadda) यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. यावेळी शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांना छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आणि पारंपारिक शाल भेट स्वरुपात दिली. तर केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा (J. P. Nadda) यांना प्रभू श्रीरामाची मूर्ती आणि पारंपारिक शाल भेट स्वरुपात दिली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community