२०३६ च्या ऑलम्पिकमध्ये चंद्रपूरचे ‘वाघ’ बघायचे आहेत; आमदार Sudhir Mungantiwar यांची तरुणांकडून अपेक्षा

34
२०३६ च्या ऑलम्पिकमध्ये चंद्रपूरचे ‘वाघ’बघायचे आहेत; आमदार Sudhir Mungantiwar यांची तरुणांकडून अपेक्षा
२०३६ च्या ऑलम्पिकमध्ये चंद्रपूरचे ‘वाघ’बघायचे आहेत; आमदार Sudhir Mungantiwar यांची तरुणांकडून अपेक्षा

प्रयत्नांना सातत्याची जोड दिली, तर असाध्य गोष्ट साध्य होऊ शकते. माझ्या चंद्रपूर-गडचिरोली (Chandrapur-Gadchiroli) जिल्ह्यात खेळणाऱ्या तरुण-तरुणींची मोठी फौज आहे. त्यांना मुबलक सुविधा, उच्च प्रतीचे स्टेडियम मी मिळवून देईन. २०३६ च्या ऑलम्पिक (2036 olampic) स्पर्धांमध्ये मला चंद्रपूर आणि गडचिरोलीचे (Chandrapur-Gadchiroli) वाघ बघायचे आहेत, अशी अपेक्षा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. चंद्रपूर येथे आयोजित विदर्भस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे उद्घाटन आमदार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.(Sudhir Mungantiwar)

( हेही वाचा : परिवहन विभाग सुरु करणार ‘स्वच्छ, सुंदर बस स्थानक अभियान’; मंत्री Pratap Sarnaik यांची घोषणा)

चंद्रपूर जिल्हा बॅडमिंटन डेव्हलपमेंट असोसिएशन व जी.एच. रायसोनी मेमोरियल यांच्या संयुक्त विद्यमाने  विदर्भस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी संघटनेचे चंद्रपूरचे अध्यक्ष गिरीश चांडक, उपविभागीय अधिकारी संजय पवार, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजीव कक्कड, मनोज सिंघवी, लक्ष्मीकांत आर्के, संस्थेचे सचिव ज्यो एलजी चांदेकर, विश्वास देशपांडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी आपल्या भाषणातून त्यांनी तरुणांना प्रोत्साहित केले. आ. मुनगंटीवार म्हणाले, ‘चंद्रपूरचा सी चॅम्पियनचा व्हावा. जीवनात यश-अपयश, जय-पराजय येत असतो; परंतु खरा स्पर्धक तोच आहे जो पराजयानंतरही विजयासाठीचे प्रयत्न सोडत नाही. मला विश्वास आहे विदर्भातील संस्कारानुसार तुम्ही सर्व बॅडमिंटनचा उत्तम खेळ दाखवाल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.(Sudhir Mungantiwar)

इनडोअर स्टेडियम करणार 

आगामी काळात चंद्रपूर जिल्हा सुविधांनी सुसज्ज करणार असून, वर्षभरात ४५०० लोकांना बसता येईल एवढ्या क्षमतेचे इनडोअर स्टेडियम साकारणार असल्याचे आ. मुनगंटीवार यांनी सांगितले. ‘चंदू चॅम्पियन’ चित्रपट पाहिल्यानंतर त्या चित्रपटाच्या नायकाला भेटलो तेव्हा एक गोष्ट लक्षात आली की, तुम्ही लक्ष्य निश्चय केले तर तुमचे यश कुणी रोखू शकणार नाही. त्यामुळे लक्ष्य निर्धारित करा. एअर कंडिशनरसाठी सोलर पॅनलची व्यवस्था करणार असून, त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणार असल्याचे आ. मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी सांगितले.(Sudhir Mungantiwar)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.