-
ऋजुता लुकतुके
भारताची अव्वल बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू पती वेंकट दत्ता साईसह तिरुमाला इथं वेंकटेश्वर मंदिरात पोहोचली. २२ ते २४ डिसेंबर या दिवसांमध्ये उदयपूरला पारंपरिक पद्धतीने झालेल्या सोहळ्यात दोघं विवाहबद्ध झाले होते. लग्न समारंभासाठी फक्त दोन्ही कुटुंबीयांचे नातेवाईक आणि मित्र हजर होते. त्यानंतर दोन्ही कुटुंबांनी हैद्राबाद इथं स्वागत सोहळा आयोजित केला आहे. लग्नानंतर आता नवदाम्पत्याने एकत्र देव दर्शन केलं. सिंधूचा पती वेंकट दत्ता साई हा पॉसिडेक्स टेक्नोलॉजीज या कंपनीत कार्यकारी संचालक आहे. (P. V. Sindhu Wedding)
(हेही वाचा- Illegal Assets : २०२४ मध्ये एसीबीकडून जप्त केली ३१६ कोटी रुपयांची बेकायदेशीर मालमत्ता)
तिरुमाला इथं वेंकटेश्वराच्या मंदिरात दर्शन घेणं ही दक्षिणेतील परंपरा आहे. आणि नवविवाहित जोडपी आवर्जून लग्नानंतर एकत्र इथे पूजा करतात. (P. V. Sindhu Wedding)
#WATCH | Tirumala, Andhra Pradesh | Badminton Player PV Sindhu, along with her husband businessman Venkata Datta Sai, offer prayers to Lord Venkateswara at Tirumala. pic.twitter.com/geqo3c5ft4
— ANI (@ANI) December 27, 2024
सिंधू ही भारताची आतापर्यंतची सगळ्यात यशस्वी बॅडमिंटनपटू आहे. आणि दोन विश्वविजेतेपदांसह तिने रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य आणि टोकयोत कांस्य जिंकलं आहे. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत दोन सुवर्णांसह एकूण ५ पदकं तिच्या नावावर आहेत. २९ व्या वर्षी सिंधूने वैयक्तिक आयुष्यात नवीन पर्व सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सिंधूला जानेवारीत पुन्हा आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळण्यास सुरुवात करायची आहे. त्यामुळे २०२४ चा हंगाम संपता संपता मिळालेल्या सुटीत सिंधूने लग्न समारंभ केला आहे. तिने स्वत: आपल्या विवाह सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. (P. V. Sindhu Wedding)
— Pvsindhu (@Pvsindhu1) December 24, 2024
सिंधूचे वडील वेंकट रमण्णा यांनी सिंधूच्या लग्नाची माहिती मीडियाला दिली होती. ‘दोन्ही कुटुंबं एकमेकांना अनेक वर्षं ओळखत होती. पण, लग्नाचा विचार दोघांनी एका महिन्यापूर्वीच केला. आणि सिंधूला डिसेंबरमध्येच वेळ असल्यामुळे घाई घाईत लग्नाची तयारी करण्यात आली,’ असं रमण्णा तेव्हा म्हणाले होते. (P. V. Sindhu Wedding)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community