वर्ष २०२५ (New Year) च्या पहिल्या दिवसापासून सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रात महत्वाचे बदल होणार आहेत. ज्यांचा सर्वसामान्यांच्या जीवनावर प्रभाव पडणार आहे. नवीन वर्षात जीएसटी, व्हिसा नियम आणि मोबाइल डेटा शुल्कातील सुधारणांपर्यंत अनेक गोष्टी बदलणार आहेत.
१ जानेवारीपासून (New Year) एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ होणार आहे. देशांतर्गत सिलिंडरची (१४.२ किलोग्राम) किंमत काही महिन्यांपासून अपरिवर्तित राहिली आहे. दरम्यान, व्यावसायिक सिलिंडरच्या किमती सातत्याने वाढत आहेत, त्यामुळे घरगुती एलपीजी दरांमध्ये संभाव्य बदल होतील हे निश्चित आहे.
कारच्या किमती
नवीन वर्षात (New Year) कारच्या किमती वाढणार आहेत, Maruti Suzuki, Tata Motors, Hyundai, Mahindra, Honda आणि Kia यांसारख्या प्रमुख वाहन निर्मात्या कंपन्या आणि Mercedes-Benz, Audi आणि BMW सारख्या लक्झरी ब्रँडसह वाहनांच्या किमती दोन ते चार टक्क्यांनी वाढवतील.
डेटा रिचार्ज प्लॅन
१ जानेवारी २०२५ (New Year) पासून लागू होणाऱ्या नवीन राइट ऑफ वे (RoW) नियमांमुळे, जीओ, एअरटेल, वोडाफोन आणि बीएसएनएलसारख्या दूरसंचार दिग्गज लवकरच त्यांच्या डेटा शुल्क योजना समायोजित करू शकतात.
मुदत ठेव नियम
१ जानेवारी २०२५ (New Year) पासून नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्या (NBFCs) आणि गृहनिर्माण वित्त कंपन्यां (HFCs) साठी मुदत ठेवी नियंत्रित करणारे नियम बदलतील. यामध्ये लोकांकडून ठेवी घेण्याच्या नियमात बदल, मालमत्ता ठेवण्याची टक्केवारी आणि आणीबाणीच्या काळात डिपॉझिट परत करणे आदी गोष्टींचा समावेश आहे.
पेन्शन काढण्यात बदल
१ जानेवारीपासून (New Year) पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. पेन्शनधारक आता देशभरातील कोणत्याही बँकेच्या शाखेतून त्यांचे पेन्शन काढू शकतील, तेही अतिरिक्त पडताळणी न करता. नवीन सेंट्रलाइज्ड पेन्शन पेमेंट सिस्टमचा कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच EPFO च्या ७८ लाख EPS पेन्शनधारकांना फायदा होण्याची अपेक्षा आहे.
जीएसटी पोर्टलमध्ये बदल
१ जानेवारी २०२५ (New Year) पासून जीएसटी पोर्टलमध्ये महत्त्वाचे बदल जाहीर केले आहेत. नवीन वर्षात करदात्यांना कठोर जीएसटी नियमांना सामोरे जावे लागेल. एक महत्त्वपूर्ण बदल म्हणजे अनिवार्य मल्टी-फॅक्टर ऑथेंटिकेशन (MFA) जीएसटी पोर्टलवर प्रवेश करणाऱ्या सर्व करदात्यांना हळूहळू लागू केली जाईल.
व्हॉट्सॲपमध्ये बदल
व्हॉट्सॲप लवकरच किटकॅटसारख्या जुन्या ऑपरेटिंग सिस्टम (OS) चालवणाऱ्या अनेक Android डिव्हाइसवर काम करणे बंद करेल. हा बदल Samsung, LG, Sony, HTC आणि Motorola सारख्या ब्रँडच्या लोकप्रिय मॉडेल्सवर परिणाम करेल.
अमेरिकेचे व्हिसा नियम
१ जानेवारी २०२५ (New Year) पासून भारतातील अमेरिकन दूतावास नॉन-इमिग्रंट व्हिसा अर्जदारांना अतिरिक्त शुल्क न आकारता त्यांच्या भेटीचे वेळापत्रक पुन्हा शेड्यूल करण्याची परवानगी देईल. परंतु, अर्जदारांनी पुनर्नियोजित अपॉइंटमेंट चुकवल्यास किंवा पुन्हा शेड्यूल करणे आवश्यक असल्यास, त्यांना नवीन अपॉइंटमेंट बुक करावी लागेल आणि पुन्हा एकदा अर्ज शुल्क भरावे लागेल.
थायलंडची ई-व्हिसा प्रणाली
१ जानेवारी २०२५ (New Year) पासून जगभरातील पर्यटक अधिकृत वेबसाइटद्वारे थायलंड ई-व्हिसासाठी अर्ज करू शकतील. पूर्वी ई-व्हिसा प्रणाली केवळ ठराविक प्रदेशातील प्रवाशांसाठी उपलब्ध होती, परंतु या विस्तारामुळे कोणत्याही देशातील अर्जदारांना प्रत्यक्ष दस्तऐवज सादर न करता, संपूर्ण व्हिसा अर्ज प्रक्रिया ऑनलाइन पूर्ण करण्याची परवानगी मिळेल.
Join Our WhatsApp Community