मुंबई हल्ल्याचा आरोपी, मोस्ट वॉन्टेड दहशतवादी अब्दुल रहमान मक्की (Abdul Rehman Makki) याचा पाकिस्तानमध्ये मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मक्की हा लष्कर-ए-तैयबा (एलईटी)चा उपप्रमुख आणि 26/11 मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज मोहम्मद सईदचा नातेवाईक होता. मक्की याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे.अब्दुल रहमान मक्की याचा पाकिस्तानातील लाहोरमध्ये मृत्यू झाला आहे.
(हेही वाचा New Year : नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून काय होणार आहेत बदल? जाणून घ्या…)
2023 मध्ये मक्कीला संयुक्त राष्ट्रांनी जागतिक दहशतवादी घोषित केले होते. त्याची सर्व संपत्तीही जप्त करण्यात आली होती. मक्की लष्कर-ए-तैयबाच्या राजकीय शाखेचे नेतृत्व करायचा. याशिवाय तो जमात-उद-दावाचा प्रमुखही होता. लष्कराच्या परराष्ट्र संबंध विभागाची जबाबदारी त्याने पार पाडली आहे. विशेष म्हणजे, भारतातील मोठ्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये मक्कीचा (Abdul Rehman Makki) थेट हात असायचा. टेरर फंडिंग प्रकरणात 6 महिन्यांची शिक्षा हाफिज सईदचा मेहुणा मक्की, याला पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी न्यायालयाने 2020 मध्ये टेरर फंडिंग प्रकरणात 6 महिन्यांची शिक्षा सुनावली होती. टेरर फंडिंग प्रकरणात शिक्षा सुनावल्यानंतर मक्कीने आपल्या हालचाली कमी केल्या होत्या. दरम्यान, मक्कीवर दहशतवादी वित्तपुरवठा, कट रचणे, षड्यंत्रात सहभाग, लष्कर-ए-तैयबाकडून किंवा त्याच्या पाठिंब्याने दहशतवादी भरती केल्याचा आरोप होता.
Join Our WhatsApp Community