Boxing Day Test : ऑस्ट्रेलियन खेळाडूंनाही जेव्हा मैदानावरील वर्तणुकीसाठी दंड झाला होता…

Boxing Day Test : विराट आणि कोन्स्टास प्रकरणानंतर ऑस्ट्रेलियन मीडियाने विराटवर आगपाखड केली आहे.

60
Boxing Day Test : ऑस्ट्रेलियन खेळाडूंनाही जेव्हा मैदानावरील वर्तणुकीसाठी दंड झाला होता…
  • ऋजुता लुकतुके

विराट कोहली आणि कसोटीत पदार्पण करणारा सॅम कोन्स्टास यांच्यात मेलबर्न कसोटीच्या पहिल्या दिवशी एक अप्रिय प्रसंग घडला. विराट कोहलीने कोन्स्टासला खांद्याने धक्का दिला आणि त्यासाठी विराट कोहलीवर शिस्तभंगाची कारवाई करत त्याच्या मानधनातील २० टक्के रकमेइतका दंडही त्याला ठोठावण्यात आला आहे. पण, अधिकृतपणे ही कारवाई होत असताना ऑस्ट्रेलियन मीडियाने आगाऊपणा करत विराट कोहलीवर टीकात्मक लेख लिहिले आहेत. एका प्रसिद्ध ऑस्ट्रेलियन वृत्तपत्राने तर कोहलीला ‘विदूषक’ म्हटलं आहे. (Boxing Day Test)

या गोष्टीवरही आता टीका सुरू झाली आहे. ऑस्ट्रेलियन माजी क्रिकेटपटू कॅरी मॅकेफी याने, ‘कोहलीची अख्खी कारकीर्द फुकटच्या मिजाशीवर उभी राहिली आहे,’ अशी टीका केली होती. मॅकेफीला त्या वाहिनीने जाहीर माफी मागायला लावली आहे. माजी ऑस्ट्रेलियन खेळाडू आणि मीडिया कोहलीवर आगपाखड करत असताना ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी आजवर क्रिकेटच्या मैदानावर केलेले गैरप्रकार आठवल्याशिवाय राहत नाहीत. ऑस्ट्रेलियन खेळाडू हे मैदानावरील आक्रमकतेसाठी ओळखले जातात आणि अनेकदा त्यामुळे अडचणीतही सापडले आहेत. पण, ऑस्ट्रेलियन मीडियाने विराटपेक्षा गंभीर प्रकरणांकडे साफ कानाडोळा केलेला दिसतो. ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी मैदानावर केलेल्या गैरवर्तणुकीची प्रकरणं पाहूया, यात फक्त व्यक्तींबरोबर केलेल्या गैरवर्तणुकीची उदाहरणं गृहित धरली आहेत. वॉर्नर, स्मिथ यांनी चेंडू कुरतडणं यासारखे प्रकार धरलेले नाहीत. (Boxing Day Test)

(हेही वाचा – Sandeep Naik करणार भाजपामध्ये घरवापसी?)

जेव्हा ग्लेन मॅग्रा विंडिज खेळाडूकडे पाहून चक्क थुंकला होता (१९९९)

हे प्रकरण १९९९ चं आहे. क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियन सद्दी तेव्हा नुकती सुरू झाली होती. वेस्ट इंडिज दौऱ्यात ग्लेन मॅग्रा चांगली गोलंदाजी करत होता आणि त्याचवेळी विंडिज सलामीवीर ॲड्रियन ग्रिफिथबरोबर त्याचं मैदानावर भांडण झालं आणि त्याचा राग येऊन मॅग्रा ग्रिफिथकडे पाहून चक्क थुंकला. मॅग्रावर आधीच इंग्लिश खेळाडू ॲलन मुलालीबरोबर झालेल्या वादामुळे मानधनातील ३० टक्के रक्कम कापण्याची शिक्षा झालेली होती. ही शिक्षा एका कसोटीपुरती नाही तर वर्षभरासाठी होती. अशावेळी या नवीन प्रकरणामुळे मॅग्राला ९०० पाऊंडांचा दंड ठोठावण्यात आला. (Boxing Day Test)

ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी आयसीसी अध्यक्षांना ढकललं (२००६)

२००६ मध्ये ऑस्ट्रेलियन संघाने चॅम्पियन्स करंडक जिंकला. मुंबईत वेस्ट इंडिजला हरवून ऑस्ट्रेलियाने ही कामगिरी केली. त्यानंतर संघ व्यासपीठावर विजय साजरा करत होता आणि करंडक प्रदान करण्याची वेळ आली तेव्हा कर्णधार रिकी पाँटिंगने आयसीसीचे तेव्हाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून अयोग्य हावभाव करत चषक अक्षरश: हिसकावून घेतला होता. इतकंच नाही तर पाँटिंगने फोटो काढताना शरद पवारांना व्यासपीठावरून चक्क ढकलून दिलं. (Boxing Day Test)

(हेही वाचा – Delhi Assembly Election : ‘आप’चा सुपडा साफ करण्यासाठी भाजपाची रणनीती; स्वबळावर न लढता NDA दिल्लीच्या मैदानात)

भारत वि. ऑस्ट्रेलिया सिडनी कसोटी (२००८)

भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय डाव सुरू असताना सौरभ गांगुलीचा झेल स्लिपमध्ये उडाला. पंचांना चेंडूचा टप्पा पडला नाही ना याची खात्री करून घ्यायची होती. त्यामुळे ते एकमेकांशी चर्चा करत होते. पण, रिकी पाँटिंगला इतकी घाई झाली होती की, तो पंचांच्या अंगावर धावून गेला आणि त्यानेच बोट वर उंचावर गांगुलीकडे पाहून तो बाद असल्याचा हावभाव केला. रिकी पाँटिंगच्या मानधनातील ३० टक्के रक्कम तेव्हा कापून घेण्यात आली होती. (Boxing Day Test)

रिकी पाँटिंगने जेव्हा हरभजन सिंगला धक्का दिला (१९९९)

शारजामध्ये झालेल्या एका एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियन खेळाडू रिकी पाँटिंगने हरभजन सिंगला जोरदार धक्का दिला होता. हरभजनने पाँटिंगला बाद केलेलं त्याला सहन झालं नाही. हरभजन तेव्हा १७ वर्षांचा तरुण होता. तंबूत परतताना पाँटिंगने आधी हरभजनची नक्कल केली आणि मग त्याला खांद्याने धक्का दिला. पाँटिंगच्या मानधनातून १५ टक्के रक्कम कापून घेण्यात आली होती. (Boxing Day Test)

(हेही वाचा – Rajapur मधील रायपाटण येथे सापडला शिवकालीन ऐतिहासिक ठेवा)

भारत वि. ऑस्ट्रेलिया, मेलबर्न एकदिवसीय सामना (२०२१)

अगदी अलीकडे २०२१ च्या दौऱ्यात मेलबर्न इथं झालेल्या एकदिवसीय सामन्यात डेव्हिड वॉर्नर आणि भारतीय फलंदाज सुरेश रैना आणि रोहित शर्मा यांच्यात बाचाबाची झाली होती. वॉर्नरने भारतीय खेळाडूंना शिवी दिल्याचं तेव्हा माईक कॅमेरानेही टिपलं होतं. ऑस्ट्रेलियाने तो सामना ४ गडी राखून जिंकला. पण, डेव्हिड वॉर्नरच्या मानधनातून १५ टक्के रक्कम कापण्यात आली. (Boxing Day Test)

गेल्यावर्षी ऑस्ट्रेलियन संघाने एकदिवसीय विश्वचषक जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियन खेळाडू मिचेल मार्श सोफ्यावर आरामात बसलाय आणि चषकावर त्याने पाय ठेवलाय असा फोटो प्रसिद्ध झाला होता. त्याला विचारल्यावर हे कृत्य मी पुन्हा पुन्हा करेन असं तो म्हणाला होता. (Boxing Day Test)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.