Mumbai Crime : मित्राने सेक्स रॅकेटमध्ये अडकवले, तन्मयने केली नस कापून आत्महत्या

471
Mumbai Crime : मित्राने सेक्स रॅकेटमध्ये अडकवले, तन्मयने केली नस कापून आत्महत्या
Mumbai Crime : मित्राने सेक्स रॅकेटमध्ये अडकवले, तन्मयने केली नस कापून आत्महत्या
मुंबईतील एका सेक्स रॅकेट मध्ये अडकलेल्या तरुणाने अटकेच्या भीतीने स्वतःच्या हाताची नस कापून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पूर्व उपनगरातील मुलुंड येथे उघडकीस आली आहे.आत्महत्या केलेल्या तरुणाकडे सापडलेल्या सुसाईड नोट वरून या सेक्स रॅकेटचे प्रकरण समोर आले असून मित्राने त्याला सेक्स रॅकेटमध्ये अडकवल्याचे आत्महत्या करणाऱ्या तरुणाने सुसाईड नोट मध्ये म्हटले आहे. मुलुंड पोलिसांनी सुसाईड नोट वरून आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी मृत तरुणाच्या मित्रावर गुन्हा दाखल केला आहे. (Mumbai Crime)
तन्मय केणी (२७) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. तन्मय केणी हा तरुण वडाळा टिटी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या एका गुन्ह्यात संशयीत म्ह्णून अडकला होता.वडाळा टिटी पोलीस ठाण्यात दोन आठड्यापूर्वी एका तरुणीच्या तक्रारीवरून अंटोप हिल प्रतीक्षा नगर येथे राहणाऱ्या सचिन करंजे (२५)याला वडाळा टिटी पोलिसांनी अटक केली होती. सचिन करंजे हा मुलींना कामावर लावण्याचे आमिष दाखवून त्यांना लॉजवर घेऊन जात होता, त्यांना गुंगीचे औषध देऊन त्यांचे अश्लील छायाचित्रे काढुन त्यांना ब्लॅकमेल करीत होता अशी माहिती समोर आली. दरम्यान सचिन करंजेने वडाळा टिटी पोलिसांच्या चौकशीत मित्र तन्मय केणी याचे नाव घेतले होते, १७ डिसेंबर रोजी वडाळा टिटीने तन्मयला चौकशीसाठी बोलवुन घेतले होते, तन्मय हा पोलीस ठाण्यात गेला मात्र आपल्याला अटक करतील या भीतीने त्याने पोलीस ठाण्याबाहेरूनच पळ काढला होता. तेव्हापासून तन्मय केणी हा बेपत्ता झाला होता, त्याचा शोध सुरू असताना तन्मय केणी याचा मृतदेह २६ डिसेंबर रोजी मुलुंड पोलिसांना त्यांच्या हद्दीत मिळून आला होता, तन्मयने हाताची नस कापून आत्महत्या केली होती. दरम्यान पोलिसांना तन्मय च्या मृतदेहाजवळ सुसाईड नोट मिळून आली, त्यात तन्मय केणीने  सचिन करंजे याचा उल्लेख केला आहे सचिन याने मला फसवले असून तो मला ब्लॅकमेल करत आहे त्याच्या जाचाला कंटाळून मी आत्महत्या करत आहे त्याला फाशी झाली पाहिजे सॉरी मम्मी पप्पा असे सुसाईड नोट मध्ये तन्मय याने नमूद केले आहे या प्रकरणी मुलुंड पोलीस ठाण्यात सचिन करंजे विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Mumbai Crime)
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सचिन हा तन्मय केणी याचे आधार कार्ड वापरून मुलींना लॉज घेऊन जात होता व मुलींचे त्यांचे फोटो काढून त्यांना ब्लॅकमेल करत होता, सचिन याच्याविरुद्ध वडाळा टिटी आणि माटुंगा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असून वडाळा टिटी पोलिसांच्या अटकेत असलेल्या सचिन चा ताबा माटुंगा पोलिसांनी घेतला होता, त्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. सचिन हा सध्या न्यायालयीन कोठडीत असून लवकरच त्याचा ताबा मुलुंड पोलीस ठाणे घेणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. (Mumbai Crime)
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.