-
ऋजुता लुकतुके
बुद्धिबळातील माजी जगज्जेता मॅग्नस कार्लसन अमेरिकेत सुरू असलेल्या रॅपिड व ब्लिट्झ बुद्धिबळ विश्वचषकातून बाहेर पडला आहे. आणि त्याचं कारण विचित्र आहे. फिडेच्या नियमानुसार, स्पर्धांसाठी आचारसंहिता असते. आणि त्यातील खेळाडूंनी काय परिधान करायचं या सदरात फिडे संचालित स्पर्धेत जीन्स घालता येत नाही. पण, विश्वचषक स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसी कार्लसन जीन्स घालून आला. आणि आयोजकांनी त्याला नियमाची आठवण करून दिल्यावरही त्याने कपडे बदलून यायला साफ नकार दिला. (Magnus Carlsen Disqualified)
(हेही वाचा- भारतीय उद्योगविश्वात ज्यांचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरले गेले, असे उद्योगपती Ratan Naval Tata…)
सुरुवातीला कार्लसनवर २०० अमेरिकन डॉलरचा दंड ठोठावण्यात आला. आणि त्यानंतर स्पर्धा आयोजक ॲलेक्स हॅलोझाक यांनी कार्लसनला कपडे बदलून यायला सांगितलं. त्यावर कार्लसनने नकार दिला. आणि तो स्पर्धेचं ठिकाण सोडून गेला. त्यामुळे गतविजेत्या खेळाडूला विचित्र कारणासाठी अपात्र ठरवण्याची वेळ आयोजकांवर आली. (Magnus Carlsen Disqualified)
FIDE statement regarding Magnus Carlsen’s dress code breach
FIDE regulations for the World Rapid and Blitz Chess Championships, including the dress code, are designed to ensure professionalism and fairness for all participants.
Today, Mr. Magnus Carlsen breached the dress code… pic.twitter.com/SLdxBpzroe
— International Chess Federation (@FIDE_chess) December 27, 2024
कार्लसनने दुसऱ्या दिवशीपासून जीन्स न घालण्याची तयारी दाखवली होती. पण, ती आयोजकांनी मान्य केली नाही. त्यामुळे कार्लसनने माधारीचाच निर्णय घेतला. ‘मला फिडेच्या या नियमांचा कंटाळा आला आहे. त्यामुळे इथून पुढे त्यांची स्पर्धा खेळण्यात मला रस नाही. माझ्या चाहत्यांची त्यामुळे निराशा होईल हे खरं आहे. पण, मला अशा वातावरणात खेळण्याचीच इच्छा राहिलेली नाही,’ असं नंतर कार्लसनने बोलून दाखवलं. (Magnus Carlsen Disqualified)
(हेही वाचा- Boxing Day Test : ‘गरज पडल्यास सिराजला संघातून वगळा,’ – सुनील गावसकर)
इतकंच नाही तर कार्लसनने रॅपिडच्या पाठोपाठ ब्लिट्झ प्रकारातूनही माघार घेतली आहे. तर फिडेनं खेळाडूंसाठीची आचारसंहिता माजी खेळाडूंच्या समितीनेच बनवली असल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. या स्पर्धेत कार्लसनची सुरुवात चांगली झाली नव्हती. आणि पहिल्या दिवसाच्या खेळानंतर कार्लसन ८० व्या स्थानावर घसरला होता. (Magnus Carlsen Disqualified)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community