Maha Kumbh 2025 मध्ये लाइट अॅण्ड साऊंड शोद्वारे सादर होणार पौराणिक कथा; 2000 ड्रोनचा वापर होणार

54

उत्तर प्रदेश सरकार Maha Kumbh 2025 मध्ये एक नेत्रदीपक लाइट अॅण्ड साऊंड शो आयोजित करणार आहे, जो प्रयागराजचे ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व अधोरेखित करेल. महाकुंभ आणि प्रयाग महात्म्य यांच्याशी निगडीत पौराणिक कथा जिवंत करून, त्रिवेणी संगमच्या वरच्या आकाशात हा शो होणार आहे. या शोमध्ये २,००० ड्रोन वापरण्यात येणार आहेत. या कार्यक्रमात समुद्रमंथन आणि अमृत पात्राचा उदय यांसारखी दृश्ये दाखवण्यात येणार आहेत, ज्यामुळे पर्यटकांना हा जादुई अनुभव मिळेल.

(हेही वाचा Sambhal मध्ये जामा मशिदीसमोर वैदिक मंत्रोच्चाराने झाले पोलीस चौकीचे भूमिपूजन)

प्रयागराज पर्यटन अधिकारी अपराजिता सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाकुंभाच्या उद्घाटन आणि समारोपाच्या वेळी संगम नाक्यावर शो आयोजित केला जाईल. हा कार्यक्रम भाविक आणि स्थानिक रहिवाशांसाठी एक अनोखा अनुभव असेल, जे त्याचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व दर्शवेल. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या संकल्पनेनुसार Maha Kumbh 2025 हा जागतिक सांस्कृतिक महोत्सव म्हणून सादर केला जाईल. याशिवाय, पर्यटकांसाठी अनेक नवीन आकर्षणे देखील असतील, जसे की वॉटर ऍक्टिव्हिटी, फ्लोटिंग रेस्टॉरंट्स, हॉट एअर बलून आणि लेझर लाईट शो. कालिंदी घाटावरील वॉटर म्युझिक फाउंटन आणि लेझर शो हेही प्रमुख आकर्षण असेल.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.