संतोष देशमुख प्रकरणात फरार आरोपींची संपत्ती जप्त करा, मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांचे CID ला आदेश

127
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणार (Massajog sarpanch Santosh Deshmukh murder case) महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपींची संपत्ती जप्त करा, असे आदेश मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीआयडीला दिले आहे. (Devendra Fadnavis)

बीड प्रकरणात जे आरोपी फरार आहेत, त्यांची संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी CID चे अतिरिक्त महासंचालक बुरडे (CID ADG Burde) यांना दिले आहेत. बंदुकी सोबत ज्यांचे-ज्यांचे फोटो आहेत, ते जर खरे असतील तर त्या सर्वांचे परवाने रद्द करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करा, असेही आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी बीडच्या पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. शिवाय तातडीने फेर आढावा घेण्यासही सांगण्यात आले आहे. 
(हेही वाचा – Delhi Assembly Election च्या प्रचाराचा पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार श्रीगणेशा)
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात (Sarpanch Santosh Deshmukh murder case) आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर तीन आरोपी अद्यापही फरार आहेत. घटनेला जवळपास 19 दिवस उलटले, तरी अद्याप फरार आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले नाही. यामुळे विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे. त्यातच आता राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फरार आरोपींची संपत्ती जप्त करा, असे आदेश सीआयडीचे (CID ADG) अतिरिक्त महासंचालक बुरडे यांना आदेश दिले आहेत.
हेही पाहा –

 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.