Electric Vehicle Charging Station : ईव्ही चार्जिंग स्टेशन उभारणीसाठी किती खर्च येतो?

Electric Vehicle Charging Station : इलेक्ट्रिक कारचा वापर हल्ली वाढला आहे.

50
Electric Vehicle Charging Station : ईव्ही चार्जिंग स्टेशन उभारणीसाठी किती खर्च येतो?
  • ऋजुता लुकतुके

इलेक्ट्रिक वाहनांचा वापर भारतात वाढत आहे. एकट्या मुंबई शहराचा आढावा घेतला तर २०२१ मध्ये शहरांत ८०,००० च्या आसपास इलेक्ट्रिक कारची नोंदणी झाली होती आणि २०२३ पर्यंत हा आकडा २ लाखांत गेला होता. तर एका अंदाजानुसार, २०३० पर्यंत शहरातील इलेक्ट्रिक कारची संख्या २३ लाखांपर्यंत गेलेली असेल. अशावेळी इलेक्ट्रिक गाड्यांच्या चार्जिंग स्टेशनची समस्या शहराला भेडसावणारच. महाराष्ट्रातील इलेक्ट्रिक वाहनांची विक्री सध्या कमी आहे कारण, तिथे पुरेशी चार्जिंग स्टेशन नाहीत. (Electric Vehicle Charging Station)

पण, नवीन चार्जिंग स्टेशन उभारायला इथं पुरेपूर वाव आहे. सध्या मुंबई सारख्या शहरातही फक्त ४६१ चार्जिंग स्टेशन आहेत. त्यामुळे शहरालाही अधिक चार्जिंग स्टेशनची गरज आहे. इलेक्ट्रिक वाहनांमधील बॅटरी वापरानुसार संपते. ती पुन्हा भरण्याचं काम चार्जिंग स्टेशनमध्ये होतं. अशा स्टेशनमुळेच इलेक्ट्रिक वाहन न थांबता रोज वापरात आणता येऊ शकतं. (Electric Vehicle Charging Station)

(हेही वाचा – Accident : मुंबईत अपघाताची मालिका सुरूच; मराठी अभिनेत्री उर्मिला कानेटकरसह तीन जखमी; एका कामगाराचा मृत्यू)

पण, बॅटरी चार्जिंगला वेळ लागतो. इतर इंधनांसारखं ते काही मिनिटांत गाडीत भरून होत नाही. त्यामुळे किमान अर्धा तास बॅटरी चार्जिंगला लावावी लागते. तीन प्रकारचे चार्जस त्यासाठी उपलब्ध आहेत. पहिल्या प्रकारात ८० टक्के बॅटरी अर्ध्या तासात चार्ज होते. रॅपिड चार्जिंगमध्ये २० मिनिटात अख्खी बॅटरी चार्ज होते. तर धिम्या गतीने बॅटरी चार्ज करणारे चार्जर काही तास घेतात. असे चार्जर खासकरून घरी किंवा सोसायटीत लावले जातात आणि तिथे गाडी लावली की, ती रात्रभर चार्ज होत राहते. (Electric Vehicle Charging Station)

भारतात चार्जिंग स्टेशन सुरू करण्याचे फारसे नियम नाहीत. पण, सुरक्षेची मार्गदर्शक तत्त्व सांभाळावीच लागतात. असं स्टेशन सुरू करायला परवाना मात्र लागत नाही. पण, ऊर्जा मंत्रालयाने घालून दिलेल्या अटींची पूर्तता करावी लागते. चार्जिंग स्टेशन कुठे उभारायचं याचेही काही नियम आहेत. शहरात दर ३ किलोमीटरवर एक चार्जिंग स्टेशन असावं असे ऊर्जा मंत्रालयाने निर्देश आहेत. त्याप्रमाणे ही जागा ठरवावी लागते. तर महामार्गांवर दर २५ किलोमीटरनी चार्जिंग स्टेशन यावं असे संकेत आहेत. (Electric Vehicle Charging Station)

(हेही वाचा – CA Salary in India : भारतात सीएला सरासरी किती पगार मिळतो?)

चार्जिंग स्टेशन सुरू करण्याचा खर्च मात्र मोठा आहे. एकतर जमीन अधिग्रहण. अशी जागा खरेदी करण्यासाठी १० ते ५० लाख रुपये लागू शकतात. त्यानंतर तुमच्याकडे ऊर्जा म्हणजेच वीज पुरवठा अव्याहत असावा लागतो. त्यासाठी लागणाऱ्या सरकारी परवानग्यांसाठी ५० हजार ते १ लाख रुपये खर्च येतो. ही जागा सुरक्षित असावी यासाठी सुरक्षेची उपकरणं बसवण्यात १ लाख रुपये खर्च येतो. सध्या भारतात ५ प्रकारचे चार्जर उपलब्ध आहेत आणि त्याची किंमत ७०,००० रुपयांपासून ते ४,००,००० रुपयांपर्यंत आहे. असे किती चार्जर तुम्हाला बसवायचे आहेत त्यावरून ही किंमत ठरते. आणि या सगळ्याच्या देखभालीसाठीही १ लाख रुपयांपर्यंतचा खर्च येऊ शकतो. (Electric Vehicle Charging Station)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.