Medical Coding Salary : भारतात मेडिकल कोडरला किती पगार मिळतो?

Medical Coding Salary : मेडिकल कोडरसाठी लागणारं शिक्षण, पगार यांची माहिती करून घेऊया.

39
Medical Coding Salary : भारतात मेडिकल कोडरला किती पगार मिळतो?
  • ऋजुता लुकतुके

मेडिकल कोडर ही वैद्यकीय क्षेत्रातील अत्यंत व्यावसायिक आणि विशेष कौशल्य लागणारी नोकरी आहे. रुग्णाला वैद्यकीय मदत मिळवून देण्याबरोबरच आरोग्य विम्याचा क्लेम पूर्ण करण्याच्या दृष्टीने कोडरचं काम महत्त्वाचं आहे. एखादा रुग्ण वैद्यकीय मदतीसाठी डॉक्टरकडे जातो आणि तिथे त्याच्या आजाराचं निदान होतं. या निदानाची रितसर ऑनलाईन नोंद होते. आणि उपचारांची दिशा ठरवली जाते. त्याचीही नोंद होते. या सर्व प्रकारच्या नोंदी मेडिकल कोडर आणि विमा कंपनीकडे पाठवल्या जातात. उपचार पद्धती आणि वैद्यकीय कोडिंग एकमेकांशी जुळत असतील तर विमा कंपनी विम्याचे पैसे त्वरित लागू करते. म्हणजेच डॉक्टर, रुग्ण आणि विमा कंपनी यांच्यातील दुवा म्हणजे मेडिकल कोडर असतो. (Medical Coding Salary)

अलीकडे या कामाला महत्त्व प्राप्त झालं आहे. रुग्णाच्या वैद्यकीय नोंदींमधून माहिती टिपून घेणे, वैद्यकीय अहवाल समजून घेणे, निदान आणि उपचार यासाठी कोडिंग करणं आणि गरजेनुसार कोडिंगचं अवलोकन करणं ही काम मेडिकल कोडरला करावी लागतात. (Medical Coding Salary)

(हेही वाचा – IPS Officer Salary : आयपीएस अधिकाऱ्याला भारतात नेमका किती पगार मिळतो?)

कुठल्याही प्रकारचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेली व्यक्ती कोडिंगचा सर्टिफिकेट कोर्स करू शकते. मेडिकल कोडरचा भारतातील सरासरी पगार हा वार्षिक ४ लाख रुपये इतका असतो. पण, अनुभवाच्या जोरावर तो वार्षिक ११ लाख रुपयांपर्यंत वाढू शकतो आणि काही ठिकाणी तासांच्या हिशोबाने मोबदला दिला जातो. तिथे तासाला ३५० रुपये इतका सरासरी मोबदला मेडिकल कोडरला मिळू शकतो. न्युरोलॉजी, ह्रदयरोग अशा विविध वैद्यकीय शाखा असतात तशाच शाखा कोडरलाही असतात. म्हणजेच एका प्रकारच्या आजारांचं कोडिंग करणारा कोडर त्या विषयातील तज्ञ असतो. (Medical Coding Salary)

विविध शहरांसाठी कोडरना मिळणारा मोबदला वेगवेगळा असतो आणि त्यानुसार, भारतात जयपूरमध्ये मेडिकल कोडरना सर्वाधिक म्हणजे सरासरी ६ लाख सुरुवातीचा पगार असतो. तर सर्वात कमी झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये असतो. हे काम घरूनही करता येतं. (Medical Coding Salary)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.