Sambhal हिंसाचाराचे दिल्लीच्या बाटला हाऊसशी कनेक्शन; अदनान, रिहारला जामियामधून अटक

75
उत्तर प्रदेशातील संभल (Sambhal) येथील मशिदीच्या सर्वेक्षणादरम्यान उसळलेल्या हिंसाचारात दिल्लीचे कनेक्शन समोर आले आहे. संभल हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी आरोपी अदनान आणि त्याचा सहकारी रिहार यांना दिल्लीच्या बाटला हाऊसमधून अटक केली आहे. पोलिसांपासून वाचण्यासाठी अनेक दंगलखोर पळून जाऊन दिल्लीत लपले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दिल्लीतील जामिया, ओखला, जाफराबाद आणि सीलमपूर भागांवर पोलिसांची विशेष नजर आहे.
रिपोर्ट्सनुसार, सपा खासदार झियाउर रहमान यांच्या घरापासून अदनानचे घर 100 मीटर अंतरावर आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अदनानला अटक केली. अदनानवर त्याच्या साथीदारांसह पोलिसांवर दगडफेक आणि जाळपोळ केल्याचा आरोप आहे. त्याच्यासोबत रिहारलाही अटक करण्यात आली आहे. आश्रय देणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

(हेही वाचा Sambhal मध्ये जामा मशिदीसमोर वैदिक मंत्रोच्चाराने झाले पोलीस चौकीचे भूमिपूजन)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंसाचारानंतर अदनान आपल्या मित्रांसोबत दिल्लीच्या जामिया भागात लपला होता. हिंसाचारानंतर आणखी अनेक दंगलखोर दिल्लीत लपून बसले असावेत, असे तपासात समोर आले आहे, त्यानंतर पोलिसांनी दिल्लीतील ओखला, जाफ्राबाद आणि सीलमपूर भागात छापे टाकण्यास सुरुवात केली आहे.(Sambhal)

संभल (Sambhal) हिंसाचारात दंगलखोरांनी पोलिसांवर दगडफेक केली आणि वाहनांना आग लावली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला होता. या काळात झालेल्या हिंसाचारात ५ जणांना जीव गमवावा लागला, तर वरिष्ठ अधिकाऱ्यांसह अनेक पोलीस जखमी झाले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.