चंद्रशेखर बावनकुळेंनी केली तीन समित्यांची घोषणा; Ravindra Chavan यांच्यावर सोपवली ‘ही’ जबाबदारी

362
रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांच्यावर नवी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी तीन समित्यांची आणि त्यांच्या प्रमुखांच्या नावाची घोषणा शनिवारी २८ डिसेंबर रोजी केली. प्रदेश संघटन पर्व समिती, प्रदेश अनुशासन समिती आणि प्रदेश सक्रिय सदस्यता अभियान अशा तीन समित्यांची घोषणा करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून माजी मंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांची भाजपाच्या प्रदेशाध्यपदी वर्णी लागणार असल्याची चर्चा सुरू होती.  महत्त्वाचे म्हणजे रवींद्र चव्हाण यांचे नाव प्रदेशाध्यक्ष पदासाठी चर्चेत होते. त्यांची प्रदेश संघटन पर्व समितीचे प्रभारी (In-charge of Pradesh Sanghatan Parv Samiti – Ravindra Chavan) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. (Ravindra Chavan)

रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) हे एकनाथ शिंदे सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून कार्यरत होते. डोंबिवलीतून (Ravindra Chavan, Dombivli) ते चौथ्यांदा विजयी झाले आहेत. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये त्यांना संधी मिळाली नाही. तर दुसरीकडे आत्ताचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना मंत्रिमंडळात महसूलमंत्रिपद मिळाले आहे, त्यानंतर आता रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांना भाजप संघटन पर्वचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

(हेही वाचा – Maharashtra Mandir Nyas Parishad : सोलापुरातून ‘मंदिर तेथे सामूहिक आरती’ला प्रारंभ!)

भारतीय जनता पक्षाचे (Bharatiya Janata Party) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तीन समित्यांची घोषणा केली. यात प्रदेश संघटनपर्व समितीचे प्रदेश प्रभारी म्हणून माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नावाची घोषणा केली आहे. भाजपाच्या संघटनात्मक बांधणीच्या नियोजनाची जबाबदारी रवींद्र चव्हाण यांच्यावर सोपविण्यात आली आहे. महाराष्ट्रात 21 डिसेंबरपासून संघटनपर्व सुरू करण्यात आले आहे. या पर्वाची सुरुवात नागपूर येथून करण्यात आली.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.