रुपाली ठोंबरेंकडून Jitendra Awhad यांचे व्हॉट्सअप चॅट व्हायरल; बीडमध्ये मोर्चाच्या आडून काय होता प्लॅन?

433

बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी आणि आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी राजकीय पक्षांनी बीडमध्ये मोर्चा काढला, त्यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) सहभागी झाले होते. या मोर्च्याच्या आडून वेगळेच काही तरी घडवून आणायचे होते, अशी शंका येणारे जितेंद्र आव्हाड यांचे व्हॉट्सचॅट राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी व्हायरल केल्याने आव्हाड यांची हडबडून गेले आणि त्यांनी तडक पोलीस ठाणे गाठून तक्रार केली.

(हेही वाचा संतोष देशमुख प्रकरणात फरार आरोपींची संपत्ती जप्त करा, मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांचे CID ला आदेश)

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यावर आरोप करत रुपाली ठोंबरे यांनी म्हटले की, सरपंच देशमुख हत्या प्रकरणात कुटुंबाला न्याय देण्यासाठी आले होते की आग लावण्यासाठी हे सांगून टाका जितेंद्र भाऊ आव्हाड.” यासोबतच ठोंबरे यांनी व्हॉट्सअॅप संभाषणाचे काही स्क्रीनशॉटही आपल्या पोस्टमध्ये जोडले होते. त्यावर जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी रुपाली ठोंबरे यांच्यावर पलटवार करताना म्हणाले की, बीडचे रहिवाशी शिवराज बांगर यांच्यासोबतचे न केलेले चॅट मॉर्फ करून व्हायरल करण्यात आले. त्यात महत्त्वाची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस -अजित पवार गटाच्या ॲड. रूपाली ठोंबरे यांची आहे. हास्यास्पद आहे की, एक ज्येष्ठ वकील असून देखील सत्य-असत्य न तपासता त्यांनी हा मॉर्फ केलेला चॅट वायरल केला. बीड शहरातील शिवाजी नगर पोलीस स्टेशनमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक खेडकर यांना भेटून मी, संदीप क्षीरसागर,  राजेश देशमुख, सातपुते आणि शिवराज बांगर यांनी गुन्हा नोंदवलेला आहे, अशी माहिती आव्हाड यांनी दिली.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.