Crime News : ज्वेलर्स मालकाला अडकविण्याचा कट पोलिसांनी उधळून लावला, पोलीस खबऱ्यासह एका वृत्तपत्र संपादकावर गुन्हा दाखल

166
Crime News : ज्वेलर्स मालकाला अडकविण्याचा कट पोलिसांनी उधळून लावला, पोलीस खबऱ्यासह एका वृत्तपत्र संपादकावर गुन्हा दाखल
Crime News : ज्वेलर्स मालकाला अडकविण्याचा कट पोलिसांनी उधळून लावला, पोलीस खबऱ्यासह एका वृत्तपत्र संपादकावर गुन्हा दाखल
दक्षिण मुंबईतील चिरा बाजार येथील एका ज्वेलर्स मालकाला अपघातात ठार मारण्याचा प्रयत्न फसल्यानंतर ज्वेलर्स मालकाला खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा कट रचण्यात आला होता, मात्र मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा कक्ष ९ च्या पथकाने हा कट उधळून लावत पोलीस खबऱ्यासह दोन जणांना अटक केली आहे. या कटात मुंबईतील एका वृत्तपत्राचा संपादकासह ज्वेलर्स कडे काम करणारा लेखपालाचा समावेश असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गुन्हे शाखेने उघडकीस आणलेल्या या कटा प्रकरणी लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात वृत्तपत्राच्या संपादकासह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (Crime News)
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष ९ च्या पथकाने देशी बनावटीच्या पिस्तुल आणि ९ काडतुस प्रकरणी निरंजन गुप्ता या पोलीस खबऱ्याला ताब्यात घेतले होते, गुन्हे शाखेने त्याच्याकडे केलेल्या कसून चौकशीत त्याने दक्षिण मुंबईतील एका ज्वेलर्स कडे कामाला असलेल्या लेखापालच्या सांगण्यावरून ज्वेलर्सला खोट्या गुन्ह्यात अडकविण्यासाठी ज्वेलर्सच्या कार्यालयात पिस्तुल ठेवुन पोलिसांना खबर देण्यासाठी सांगितले होते अशी धक्कादायक माहिती समोर आली. गुन्हे शाखेने तात्काळ ज्वेलर्स कडे काम करणाऱ्या लेखापाल याला ताब्यात घेऊन कार्यालयात ठेवण्यात आलेले देशी बनावटीचे पिस्तुल आणि ९ काडतुसे जप्त करण्यात आली. गुन्हे शाखेने या प्रकरणी लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात पोलीस खबरी आणि लेखापाल यांच्याविरुद्ध कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून दोघांना अटक करण्यात आली. (Crime News)
या दोघांकडे पोलिसांनी कसून चौकशी केली असता आणखी एक धक्कादायक माहिती पोलिसांनी केलेल्या चौकशीत समोर आली, दक्षिण मुंबईतील ज्वेलर्स मालकाची असलेली एक जागेचा वाद सुरू आहे, ज्वेलर्स मालकाला विकासीत करायची होती, मात्र त्या ठिकाणी भाडेतत्वावर राहणारा एक इसम ही जागा सोडण्यास तयार नव्हता, या जागेच्या वादात दक्षिण मुंबईतील एका वृत्तपत्राच्या संपादकाने उडी घेतली. नोव्हेंबर महिण्यात या ज्वेलर्सचा अपघात घडवून त्याला मारण्याचा कट रचण्यात आला, नोव्हेंबर महिण्यात अपघात देखील घडवून आणला होता, परंतु सुदैवाने ज्वेलर्स मालक या अपघातातुन बचावले. या आपघाताची नोंद लो. टी. मार्ग पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. (Crime News)
ही योजना असफल झाल्यानंतर भाडेकरू, संपादक यांनी ज्वेलर्सला खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा कट रचला, त्या साठी त्यांनी ज्वेलर्सच्या लेखापाल याला देखील हाताशी घेतले, त्यानंतर निरंजन गुप्ता या पोलीस खबऱ्याला या कटात सामील।करून घेतले, पिस्तुल आणण्यासाठी आणि त्याची खबर पोलिसांना देण्यासाठी त्याला अडीज लाख रुपये देण्यात आले होते, या योजनेनुसार पिस्तुल आणि काडतुसे बिहार येथून आणून लेखपालच्या मदतीने ते ज्वेलर्सच्या कार्यालयात ठेवण्यात देखील आले होते,आणि खबरी पोलिसांना खबर देऊन आपले काम देखील फत्ते केले होते. मात्र पोलिसांना यामध्ये संशय आला आणि खबऱ्याची उलट तपासणीमध्ये हा कट समोर आला. गुन्हे शाखेने उघडकीस आणलेल्या या कटा प्रकरणी लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात वृत्तपत्राच्या संपादकासह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.  (Crime News)
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.