गुजरातमधील (Gujarat earthquake) कच्छची जमीन पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरली आहे. रविवार, २९ डिसेंबर रोजी सकाळी कच्छमध्ये ३.२ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का जाणवला. गांधीनगर येथील सिस्मॉलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूटनुसार, कच्छमध्ये सकाळी १० वाजून ०६ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर ३.२ इतकी मोजली गेली आहे. भूकंपाची तीव्रता कमी असल्याने कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झाली नाही. (Earthquake Update)
तीनपेक्षा जास्त तीव्रतेचा तिसरा भूकंप
सिस्मॉलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूटच्या (Seismological Research Institute) म्हणण्यानुसार, या भूकंपाचा केंद्रबिंदू भचाऊच्या उत्तर-ईशान्येस १८ किलोमीटर अंतरावर होता. या महिन्यात जिल्ह्यात तीनपेक्षा जास्त तीव्रतेचा हा तिसरा भूकंप आहे. यापूर्वी २३ डिसेंबर आणि ७ डिसेंबरलाही कच्छमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. 23 डिसेंबर रोजी कच्छमध्ये ३.७ रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. ७ डिसेंबरलाही भूकंपामुळे कच्छची भूमी हादरली. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर ३.२ मोजली गेली.
जम्मू-काश्मीरमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले
जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu Kashmir earthquake) शुक्रवारीही भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर चार मोजली गेली. उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात रात्री ९.०६ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू १० किलोमीटर खोलीवर होता. भूकंपामुळे कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही.
(हेही वाचा – Accident News : पंढरपूरजवळ खासगी बसचा भीषण अपघात, दोन भाविक ठार)
तेलंगणात भूकंप
४ डिसेंबर रोजी तेलंगणातील (Telangana earthquake) मुलुगु येथे ५.३ तीव्रतेचा भूकंप जाणवला. भूकंपामुळे कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही. सकाळी ७.२७ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. मुलुगुजवळील वारंगलमधील अनेक रहिवाशांनी सांगितले की, सकाळी ७.३० च्या सुमारास त्यांना काही सेकंदांसाठी भूकंपाचे धक्के जाणवले. छताचे पंखे हलू लागले आणि कपाटातून वस्तू पडू लागल्या. मुलुगु राज्याच्या राजधानीपासून सुमारे २०० किलोमीटर अंतरावर आहे. तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये पाचपेक्षा जास्त तीव्रतेचे भूकंप क्वचितच होतात. असे विधान नॅशनल जिओफिजिकल रिसर्च इन्स्टिट्यूटचे (एनजीआरआय) निवृत्त शास्त्रज्ञ पूर्णचंद्र राव (Retired Scientist Purnachandra Rao) म्हणाले.
हेही वाचा –