Ladki Bahin Yojana मध्ये बांगलादेशी घुसखोर महिलांची ‘घुसखोरी’; कथावाचक देवकीनंदन ठाकूर यांचा आरोप

108

सध्या महाराष्ट्रात सर्वत्र चर्चेत असलेली लोकप्रिय योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या (Ladki Bahin Yojana) लाभार्थींमध्ये बांगलादेशी घुसखोर महिलांची संख्या अधिक असेल असा संशय कथावाचक देवकीनंदन ठाकूर यांनी भागवत कथेदरम्यान व्यक्त केला आहे. यावर त्यांनी फडणवीस सरकारकडे लक्ष ठेवण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, लाडकी बहीन योजना (Ladki Bahin Yojana) ही महाराष्ट्र शासनाची सर्वात मोठी योजना आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत याची खूप चर्चा झाली. विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या विजयाचे सर्वात मोठे श्रेय या योजनेला मिळते आहे. अनेक नेत्यांनीही त्यांच्या विजयाचे श्रेय लाडकी बहीण योजनेला (Ladki Bahin Yojana) दिले. विधानसभा निवडणुकीत आम्हाला लाडक्या बहिणींनी वाचवले, असे म्हणत नेतेमंडळींनीही त्यांच्या विजयासाठी लाडकी बहीण योजना आणि लाडक्या बहिणींना श्रेय दिले.

(हेही वाचा काँग्रेसने माजी पंतप्रधान P. V. Narasimha Rao यांच्या पार्थिव शरीराचा केलेला अवमान; वाचा एक क्लेशदायक कहाणी…)

देवेंद्र फडणवीसांना केली विनंती

देवकी नंदन ठाकूर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आवाहन केले की, बांगलादेशात हिंदूंविरुद्ध कट रचणाऱ्या अशा लोकांवर आपल्या देशवासीयांच्या कराचा पैसा खर्च होऊ नये, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी २७ जानेवारी रोजी प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्यात सनातन धर्म संसद आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा केली. देवकीनंदन ठाकूर यांनी बांगलादेशला तांदूळ आणि इतर मदत पाठवल्याबद्दल देखील आक्षेप घेतला. बांगलादेश जोपर्यंत हिंदूंवर होणारे अत्याचार स्वीकारत नाही आणि त्यांच्या सुरक्षेची हमी देत नाही, तोपर्यंत त्यांना कोणतीही मदत देऊ नये, असे देवकीनंदन ठाकूर म्हणाले. यावेळी बोलताना ठाकूर यांनी भारतीय शिक्षण व्यवस्थेत रामायण आणि भागवत यांचा समावेश करण्याची सूचना केली आहे. त्याशिवाय त्यांनी वक्फ बोर्डाला दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीवरही प्रश्न उपस्थित केला आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.