Love Jihad : प्रदीप सोलंकी असल्याचे भासवत मोहसिनने केला हिंदू तरुणीवर अत्याचार

158
Love Jihad : प्रदीप सोलंकी असल्याचे भासवत मोहसिनने केला हिंदू तरुणीवर अत्याचार
Love Jihad : प्रदीप सोलंकी असल्याचे भासवत मोहसिनने केला हिंदू तरुणीवर अत्याचार

मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) खरगोन जिल्ह्यात मोहसिन नावाच्या एका तरुणाने प्रदीप सोलंकी असल्याचे भासवत हिंदू (Hindu) तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर पीडितेवर बलात्कार करून तिची अश्लील व्हिडिओ बनवून पीडितेला ब्लॅकमेल करण्यात आले तसेच पैसे उकळण्याचा ही प्रयत्न करण्यात आला. या दोघांची ओळख करून देण्यात पीडितेच्या मैत्रिणीचा हात होता. पोलिसांनी याप्रकरणी दि. २८ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल केला आहे. (Love Jihad)

( हेही वाचा : Ladki Bahin Yojana मध्ये बांगलादेशी घुसखोर महिलांची ‘घुसखोरी’; कथावाचक देवकीनंदन ठाकूर यांचा आरोप

वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना खरगोनच्या कोतवाली नगर परिसरातील आहे. इथे दि. २८ डिसेंबर रोजी २३ वर्षीय पीडितेने पोलिसात तक्रार दाखल केली. तक्रारदार पीडितेने सांगितले की, अंदाजे ३ वर्ष पहिले मैत्रिण सुनीताने धार जिल्ह्यातील एका मुलाशी ओळख करून दिली. सुनीताने मुलाला हिंदू(Hindu) असल्याचे सांगितले. तसेच तरुणानेही आपली ओळख प्रदीप सोलंकी असल्याचे पीडितेला सांगितले. (Love Jihad)

पहिल्यांदा दोघांची भेट एका दर्ग्यात घडवून आणली गेली. पीडितेची तब्येत ठिक नसायची. तेव्हा मैत्रिणीने तिला दर्ग्यात नेले. काही दिवसांनी प्रदीपच्या ओळखीनंतर दोघेही जवळ आले. प्रदीप असल्याचे सांगणाऱ्या मोहसिनने (Mohsin) पीडितेला भाड्याच्या घरात घेऊन जाण्यास सुरुवात केली. तेव्हाच मोहसिनने पीडितेवर बलात्कार केला आणि अश्लील व्हिडिओही शुट केली. (Love Jihad)

त्यानंतर पीडितेला स्वत:ची आक्षेपार्ह व्हिडिओ दाखवून मोहसिनने (Mohsin)तिच्यावर बलात्कार केला. तसेच मोहसिन पीडितेकडून पैसे उकळू लागला. त्यादरम्यान पीडितेला प्रदीप सोलंकी हा मुस्लिम असल्याचे कळले. तसेच त्याचे नाव मोहसिन असल्याचे ही कळले. त्यानंतर पीडितेने मोहसिनशी (Mohsin)दूर राहण्याचा निर्णय घेतला. मात्र यामुळे मोहसिन पीडितेवर चिडला. तसेच पीडितेला निकाह करण्यास दबाव टाकू लागला. नकार देताच पीडितेला अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकीही त्याने दिली. त्यानंतर कुठलाच मार्ग शिल्लक न राहिल्याने पीडितेने मोहसिनच्या विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावेळी हिंदू (Hindu)संघटनांचे अनेक कार्यकर्ते कोतवाली नगर येथील पोलिस ठाण्यात पोहचले. (Love Jihad)

पीडितेच्या सोबत असणाऱ्या हिंदू (Hindu)संघटनेच्या लोकांनी पोलिसांना मोहसिनने लव्ह जिहाद केल्याचे सांगत कठोर शिक्षेची मागणी केली. पोलिसांनी मोहसिनच्या (Mohsin)विरोधात SC\ST कायद्याअंतर्गत आणि मध्य प्रदेश धार्मिक स्वतंत्रता अधिनियम २०२१ सहित अन्य कलमांखाली गुन्हा दाखल केला. केस दाखल होताच मोहसिन फरार झाला आहे. त्यानंतर पोलिसांनी तपासासाठी मोहसिनची साथीदार पीडितेची मैत्रिण सुनीता हीला ही ताब्यात घेतले आहे. (Love Jihad)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.