Dr. Manmohan Singh यांच्या अस्थी विसर्जनाला काँग्रेस नेते अनुपस्थित; फक्त फोटो काढायला येतात; भाजपाचा टोला

84

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग (Dr. Manmohan Singh) यांचे स्मारक आणि अंत्यसंस्कार यावरून अजूनही राजकारण सुरू आहे. डॉ. मनमोहन सिंग यांच्या स्मारकाच्या उभारणीसाठी जमीन का दिली जात नाही आणि त्यासाठी दिरंगाई का केली जात आहे, असा सवाल काँग्रेस सातत्याने उपस्थित करत आहे. तसेच निगम बोध घाटावर झालेल्या अंत्यसंस्कारावरही काँग्रेसने प्रश्न उपस्थित केले आहेत. यावर प्रतिक्रिया देताना केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी काँग्रेसचे लोक फक्त फोटो काढण्यासाठी येतात, मात्र डॉ. मनमोहन सिंग (Dr. Manmohan Singh) यांच्या अस्थी विसर्जनाला कोणीही आले नव्हते, असे म्हटले.

(हेही वाचा काँग्रेसने माजी पंतप्रधान P. V. Narasimha Rao यांच्या पार्थिव शरीराचा केलेला अवमान; वाचा एक क्लेशदायक कहाणी…)

काँग्रेसने उपस्थित केलेल्या प्रश्नांवर भाजपाने जोरदार प्रत्युत्तर दिले. या मुद्द्यावर काँग्रेस फक्त राजकारण करत आहे, असे भाजपच्या बाजूने सांगण्यात आले आहे. तसेच भाजपाने यापूर्वीच डॉ. मनमोहन सिंग (Dr. Manmohan Singh) यांचे स्मारक उभारण्याबाबत मंत्रिमंडळात निर्णय झाल्याचे सांगितले आहे. निगम बोध घाटात मात्र अंत्यसंस्कारावर प्रश्न उपस्थित करून काँग्रेस फक्त राजकारण करत आहे असे म्हटले. केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांनी काँग्रेसच्या आरोपांवर हल्लाबोल करत काँग्रेस बिनबुडाचे आरोप करत असल्याचे म्हटले. डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार करण्यात आले. ज्या स्मारकाबाबत बोलले जात होते ते स्मारकासाठी सरकार तयार आहे, परंतु सध्याची परिस्थिती अशी आहे की, त्यात काही अडचणी आहेत. गेले तीन दिवस मुसळधार पाऊस पडत होता, त्यामुळे मोकळ्या जागेत अंत्यसंस्कार करता येत नव्हते. हरदीप पुरी म्हणाले की, काँग्रेस सरकारच्या काळातही देशाच्या अनेक माजी पंतप्रधान आणि राष्ट्रपतींचे अंत्यसंस्कार एकता स्थळावर झाले आहेत, जिथे त्यांचे स्मारकही बांधले गेले आहे. काँग्रेसची इच्छा असती तर डॉ. मनमोहन सिंग (Dr. Manmohan Singh) यांच्यावर त्या ठिकाणी अंत्यसंस्कार करता आले असते कारण ती जागा आधीच चिन्हांकित आहे आणि त्या ठिकाणी दोन स्मारक बांधण्यासाठी जागा शिल्लक आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.