Koneru Humpy यांनी पटकावले वर्ल्ड रॅपिड बुद्धीबळ चॅम्पियनशिपचे विजेतेपद

81
Koneru Humpy यांनी पटकावले वर्ल्ड रॅपिड बुद्धीबळ चॅम्पियनशिपचे विजेतेपद
Koneru Humpy यांनी पटकावले वर्ल्ड रॅपिड बुद्धीबळ चॅम्पियनशिपचे विजेतेपद

भारताची ग्रँडमास्टर कोनेरू हम्पी (Koneru Humpy) हिने इंडोनेशियाच्या इरेन सुकंदरचा पराभव करून दुसऱ्यांदा जागतिक जलद बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. या विजयासह दुसऱ्यांदा वर्ल्ड रॅपिड चॅम्पियनशिपचे (World Rapid Chess Championship) विजेतेपद पटकावणारी ती भारतातील पहिली महिला बुद्धिबळपटू ठरली आहे. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर अशी कामगिरी करणारी ती दुसरी बुद्धिबळपटू ठरली आहे. Koneru Humpy)

( हेही वाचा : Love Jihad : प्रदीप सोलंकी असल्याचे भासवत मोहसिनने केला हिंदू तरुणीवर अत्याचार

37 वर्षीय हम्पीने 11 पैकी 8.5 गुणांसह स्पर्धा पूर्ण केली.आणि यासह विजेतेपद पटकावले.अंतिम फेरी सुरू होण्यापूर्वी सहा खेळाडू 7.5 गुणांसह कोनेरू हम्पीसोबत संयुक्तरित्या पहिल्या क्रमांकावर होते. या खेळाडूंमध्ये जू वेनझुन, कॅटरिना लागनो, हरिका द्रोणावल्ली, अफरोजा खामदामोवा, टॅन झोंग्यी आणि इरीन या खेळाडूंचा समावेश होता. विशेष म्हणजे या सर्व खेळाडूंचे सामने अनिर्णित सुटले, परंतु हम्पीने इंडोनेशियाच्या (Indonesia) इरिन सुकंदरचा अंतिम फेरीत पराभव केला आणि विजेतेपद सुद्धा पटकावले. 2023 साली हम्पीला परभावला सामोरे जावे लागले होते. परंतु यावेळी जबरदस्त खेळाचे प्रदर्शन करत तिने विजेतेपद पटकावले आहे.Koneru Humpy)

या विजयासह हम्पीने भारतीय बुद्धिबळासाठी वर्षाचा शेवट केला. त्यांची ही कामगिरी विशेष होती. यापूर्वी 2019 साली जॉर्जिया येथे कोनेरू हम्पीने (Koneru Humpy) वर्ल्ड रॅपिड चेस चॅम्पियनशिप (World Rapid Chess Championship) जिंकली होती. याशिवाय हंपीने अनेक विक्रम केले आहेत.हम्पीने नेहमीच वेगवान जगात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. मॉस्को येथे झालेल्या स्पर्धेत तिने 2012 च्या आवृत्तीत कांस्यपदक जिंकले होते. अलीकडेच गुकेशने वर्षाच्या शेवटच्या महिन्यात म्हणजे डिसेंबरमध्येच इतिहास रचला होता. सिंगापूर (Singapore) येथे झालेल्या शास्त्रीय बुद्धिबळ जागतिक स्पर्धेत चीनच्या डिंग लिरेनचा पराभव करून डी गुकेश चॅम्पियन बनला.Koneru Humpy)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.