BJP मध्ये Prajakta Mali वरून मतभेद?

225
BJP मध्ये Prajakta Mali वरून मतभेद?
BJP मध्ये Prajakta Mali वरून मतभेद?

बीडच्या मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून वेगवेगळे वाद निर्माण होत आहेत. भाजपाचे आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी बीडमधील भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित करून धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना टार्गेट करताना काही अभिनेत्रींची नावे घेतली आणि पुढे जाऊन त्याचे समर्थनही केले. यात सर्वात जास्त चर्चा झाली ती प्राजक्ता माळीची.

प्राजक्ताताई सुद्धा परळीत येतात

सुरेश धस (Suresh Dhas) यांनी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि वाल्मिक कराड यांना लक्ष्य करताना, “विटभट्ट्या, जमीन बळकावून त्यावर अवैध बांधकाम करून प्रचंड पैसा मिळवला जात आहे. त्यातून इव्हेंट मॅनेजमेंट केले जाते. यासाठी सपना चौधरी, रश्मिका मंदाना, प्राजक्ता माळी (Prajakta Mali) यांना इथे आणले जाते. जर कुणाला चित्रपट काढायचा असेल तर या अशा मोठ्या विभूतींवर काढता येईल. प्राजक्ताताई माळी (Prajakta Mali) सुद्धा आमच्या परळीत येतात. परळीचा हाही एक पॅटर्न आहे,” असे वक्तव्य धस यांनी केले आणि वाद उफाळून आला.

(हेही वाचा – Love Jihad : प्रदीप सोलंकी असल्याचे भासवत मोहसिनने केला हिंदू तरुणीवर अत्याचार)

धस यांनी माफी मागावी

धस (Suresh Dhas) यांनी रश्मिका मंदाना, सपना चौधरी यांच्यासह मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीचेही (Prajakta Mali) नाव घेतले. रश्मिका आणि सपना यांनी पत्रकार परिषद घेतली नाही. प्राजक्ता माळी (Prajakta Mali) हिने शनिवारी २८ डिसेंबर २०२४ या दवाशी मुंबईत पत्रकार परिषद घेत धस (Suresh Dhas) यांनी माफी मागावी अशी मागणी केली.

चुकीचे काहीच बोललो नाही

धस यांनी मात्र आपण चुकीचे काहीच बोललो नसल्याचे स्पष्ट केले. तसेच संविधानाने सगळ्यांना अभिव्यक्ति स्वातंत्र्य दिले असून आपण उघडपाने माध्यमांसमोर बोललो आहोत, अशी पुष्ती त्यांनी जोडली.

(हेही वाचा – Accident News : पंढरपूरजवळ खासगी बसचा भीषण अपघात, दोन भाविक ठार)

प्राजक्ता तू एकटी नाही

भाजपाच्याच विधान परिषद सदस्या, आमदार चित्रा वाघ यांनी ‘X’ या समाज माध्यमावर पोस्ट करून प्राजक्ता माळीला पाठिंबा दर्शविला. स्त्रीचा सन्मान याला भाजपाचे सर्वोच्च प्राधान्य कायमच राहिलेले आहे, त्यामुळे कुणालाही कुणाचेही नाव घेऊन अशा पद्धतीने चिखलफेक करण्याचा अधिकार नाही, असे मत त्यांनी आपल्या पोस्टमध्ये व्यक्त केले आहे. तसेच पुढे म्हटले की, “या लढाईत प्राजक्ता तू एकटी नाही, हा विश्वास देते.” भाजपाचे आमदार आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही प्राजक्ता माळी (Prajakta Mali) हिच्या बाजूने बोलत धस यांनी महिलांबाबत सांभाळून बोलावे असा सल्ला दिला.

भाजपा नेत्यांमध्येच मतभेद

त्यामुळे प्राजक्ता माळी (Prajakta Mali) हिच्यावरून भाजपा नेत्यांमध्येच मतभेद निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. प्राजक्ताचे नाव धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याशी जोडणारे आणि प्राजक्ता माळीला (Prajakta Mali) पाठींबा दोन्ही बाजूने भाजपा नेते बोलत आहेत.

यापूर्वी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांची पत्नी करुणा शर्मा यांनीही रश्मिका मंदाना, सपना चौधरी आणि प्राजक्ता माळी (Prajakta Mali) यांची नावे घेऊन काही आरोप केले होते.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.