Shri Shiv Pratishthan Hindustan च्या धारकऱ्यांना श्री सांकशी गडावर गड संवर्धन मोहीम राबवताना सापडली पुरातन पिंड, नंदी आणि गड देवताची मूर्ती

गडावरील पाण्याचे टाके साफ करत असतांना पाण्याच्या टाक्यात श्री महादेवाची पिंड, भग्न अवस्थेतील नंदी महाराज आणि हातात धनुष्य बाण घेतलेली गड देवतेची मूर्ती अशा ३ पुरातन मूर्ती टाक्यातील गाळ काढताना श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकऱ्यांना सापडल्या.

145

शिवछत्रपतींनी जो गडकोटांचा वारसा आपल्याला दिला, तो जपण्यासाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या (Shri Shiv Pratishthan Hindustan) माध्यमातून मागील चार वर्षांपासून श्री सांकशी गडावर निरंतर गड संवर्धन मोहिमा होत आहेत आणि या गड संवर्धन मोहिमेत पेण, पनवेलसह आजूबाजूच्या परिसरातूनही अनेक धारकरी, सेवेकरी गड संवर्धन मोहिमेत सहभागी होत असतात. रविवार, २९ डिसेंबर २०२४ ला श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची (Shri Shiv Pratishthan Hindustan) श्री सांकशी गडावरील ४७ वी मोहीम राबवत असता, गडावरील पाण्याचे टाके साफ करत असतांना पाण्याच्या टाक्यात श्री महादेवाची पिंड, भग्न अवस्थेतील नंदी महाराज आणि हातात धनुष्य बाण घेतलेली गड देवतेची मूर्ती अशा ३ पुरातन मूर्ती टाक्यातील गाळ काढताना श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकऱ्यांना सापडल्या.

IMG 20241229 WA0027 scaled

(हेही वाचा काँग्रेसने माजी पंतप्रधान P. V. Narasimha Rao यांच्या पार्थिव शरीराचा केलेला अवमान; वाचा एक क्लेशदायक कहाणी…)

धारकऱ्यांच्या कार्याला मिळाली पोचपावती 

आजपर्यंत ४६ गड संवर्धन मोहिमा श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या (Shri Shiv Pratishthan Hindustan) माध्यमातून झाल्या, त्यामध्ये गडावरील दगड, माती, गाळ याने भरलेल्या अनेक पाण्याच्या टाक्या स्वच्छ करण्यात धारकरी बंधूंना यश मिळाले आहे, पण ही मोहीम सर्व गड संवर्धन मोहिमांचा आनंद द्विगुणित करणारी आणि सर्वांना शिवकाळात घेवून जाणारी ठरली.

यापूर्वी श्री सांकशी गडावर कोणत्याही देव-देवतेची मूर्ती नसताना धारकरी गडावर गड संवर्धन कार्य चालू करण्यापूर्वी गड देवतेचे स्मरण करुन गडाला नारळ, हार वाहून पूजा करत होते आणि  प्रत्येक जण गडाच्या गड देवतेला साकड घालत होते, प्रार्थना करत होते, गड संवर्धन कार्य करणाऱ्यांना शक्ती आपल्या कार्याला यश दे, तसेच ज्याप्रमाणे शिवकाळात, मागच्या काळात आपल्या मावळ्यांनी, पूर्वजांनी गडावर आपल्या देव-देवदेवतेची पूजा केली असेल ते भाग्य आम्हाला आजच्या काळात मिळूदे, आम्हालाही गडावरील देव-देवतांची सेवा करायचे, पूजा करायचे भाग्य मिळूदे, अशी प्रार्थना धारकरी करत असत. त्याची अनुभूती सांकशी गडाच्या गडदेवतेने आणि श्री महादेवाच्या रुपात नंदी महाराजांनी धारकऱ्यांना दिली. गडावर सर्व देवतांचा अभिषेक घालून पूजा आणि आरती करुन भंडारा उधळून सर्वांनी आनंद उत्सव साजरा केला.

IMG 20241229 WA0054 scaled

ही आपल्याला साक्षात भगवंतांनी आपल्या कार्याची दिलेली पोच पावती आहे, हे फळ आहे, असा विश्वास श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या (Shri Shiv Pratishthan Hindustan) सर्व धारकऱ्यांना आणि गडावर कार्य करणाऱ्या सर्व सेवेकऱ्यांना वाटला.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.