पुण्यातील त्या ‘हिरव्या’ भिंतीला खासदार Medha Kulkarni यांनी दिला भगवा रंग; म्हणाल्या, हम भगवा धारी है…

117
पुण्यातील त्या 'हिरव्या' भिंतीला खासदार Medha Kulkarni यांनी दिला भगवा रंग; म्हणाल्या, हम भगवा धारी है...
पुण्यातील त्या 'हिरव्या' भिंतीला खासदार Medha Kulkarni यांनी दिला भगवा रंग; म्हणाल्या, हम भगवा धारी है...

पुण्यात सदाशिव पेठेत एका भींतीवरील हिरवा रंग हा चर्चेचा विषय ठरला आहे. पण हा केवळ रंगाचा विषय नसून त्यामाध्यमातून जागा काबीज करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप भाजपा खासदार मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) यांनी केला आहे.

काय आहे प्रकरण?

सदाशिव पेठेतील ज्ञानप्रबोधिनी शाळेच्या (Gyanprabodhini School) शेजारील गल्लीत हिरवा रंग देऊन, त्याठिकाणी हार, फुले, अगरबत्ती लावण्यात आल्याचे समोर आले. त्याठिकाणचे फोटो आणि व्हिडिओ व्हाट्सअपवर व्हायरल झाले. त्यामुळे या ठिकाणी हिरवा रंग देऊन प्रार्थनास्थळामध्ये रुपांतर करण्याचा प्रयत्न केला जात होता, असे खासदार मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) म्हणाल्या.

तसेच ती भिंत एका संस्थेच्या इमारतीचा भाग आहे. मला अनेकांनी व्हाट्सअप वर तो मेसेज पाठवला होता. त्यामुळे आम्ही तिथे ॲक्शन घेतली हिरव्याच भगव करून टाकलं.शनिवार वाड्याच्या (Shaniwar Wada) आसपास देखील अशा काही घटना आहेत. तरी या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली आहे, असे कुलकर्णी (Medha Kulkarni) म्हणाल्या.

मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni)म्हणाल्या की, असा अचानक हिरवा रंग का दिला जातोय, , त्यामागील खेळी काय आहे, हे लोकांसमोर आणले गेले पाहिजे. असे प्रकार कुठं झाले तर हे तुम्ही त्यांना विचारण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागात अशा गोष्टी चालू आहेत. हळूहळू जागा काबीज केल्या जातात. छोट्या पद्धतीने सुरू झालेली कृती मोठ्या प्रार्थना स्थळांमध्ये रूपांतरित होतात, असा आरोप कुलकर्णी यांनी केला. तसेच महाराष्ट्रात आणि देशात लोक अस्वस्थ आहेत अचानकपणे वक्फ बोर्ड जमिनीवर दावा करतो, याकडे कुलकर्णी (Medha Kulkarni) यांनी लक्ष वेधले.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.