Veer Savarkar : तात्याराव, कशाला या देशात जन्म घेतलात?

184
Veer Savarkar : तात्याराव, कशाला या देशात जन्म घेतलात?
Veer Savarkar : तात्याराव, कशाला या देशात जन्म घेतलात?
मंजिरी मराठे

सावरकर, का या देशात जन्माला आलात?
तुमच्या कार्याची इथे कोणालाही किंमत नाही, जाण नाही.
सावरकर (Veer Savarkar), तुम्ही पुरस्कार केला तो हिंदुत्वाचा! आणि आत्ता देशात कधी नव्हे इतक्या जोराने हिंदुत्वाचे वारे वाहू लागल्यामुळे तर कायम ‘धर्मनिरपेक्षते’चे गोडवे गाणारे तुमचा अपमान करण्याची एकही संधी सोडणार नाहीत.
सुमारे दहा हजार पानांची साहित्य निर्मिती आणि सुमारे बारा हजार ओळींची काव्य निर्मिती करूनही तुमच्या साहित्यातील योगदानाकडे दुर्लक्ष करत तुम्हाला साहित्य संमेलनात स्थान नाकारले जाते, ते तुम्ही जहाल गटाचे होतात असल्या बेगडी कारणानं. जहाल कोट्यातून एका व्यक्तीला, लोकमान्य टिळकांना (Lokmanya Tilak) स्थान दिले ना? मग आणखी सावरकर कशाला?

सावरकर तुम्ही इतके कसे हो दुर्दैवी? तुम्हाला जिवंतपणी अवहेलना सोसावी लागलीच, पण मरणानंतरही तुमचे भोग संपू नयेत? पण खरे दुर्दैवी आम्ही आहोत की, आम्ही तुमच्या विचारांवर देश चालवू शकलो नाही. (Sahitya Sammelan 2025)

(हेही वाचा – Valmik Karad अटक कि अजूनही आहे फरार ?; शेवटचे लोकेशन महाराष्ट्राबाहेरचे)

तुम्ही म्हणत होता, जातीच नकोत, अस्पृश्यता नको पण या मंडळींनी तुम्हालाच ब्राह्मण म्हणून अस्पृश्य ठरवत वाळीत टाकलं आहे.

तुम्ही मराठीवरील परकीय भाषांचं आक्रमण थोपवण्यासाठी भाषा शुद्धी आंदोलन चालवलं. त्यावेळी देखील सुरुवातीला तुमची हेटाळणीच झाली. पण कालांतरानं मत परिवर्तन होऊन माधव ज्युलियन यांच्यासारखे कवी भाषा शुद्धीचा पुरस्कार करू लागले.

हुतात्मा, महापौर, दिग्दर्शक, छायाचित्रण, बाह्यचित्रण असे असंख्य शब्द भलेही तुम्ही मराठी भाषेला दिले असले तरी त्यासाठी त्यांनी तुम्हाला साहित्य संमेलनात का स्थान द्यावं?

तुमची ब्राह्मणी भाषाच त्यांनी का प्रमाण मानावी? मराठीत इंग्रजी शब्द घुसडून मराठी भाषा विद्रूप करू पण तुमची ब्राह्मणी भाषा वापरणार नाही, हा त्यांचा बाणा.

ही डावी विचारसरणी. देशाचं भवितव्य, अस्तित्व, देशाचं वैभव याच्याशी त्यांना काही देणंघेणं नाही. ते हिंदू असले तरीही स्वतःची पोळी भाजण्यासाठी त्यांना हिंदुत्व नको आहे, त्यामुळे हिंदुत्वाचे प्रणेते सावरकरही नकोच आहेत. (हिंदूंचं अस्तित्वच संपलं की डावे असो की उजवे सगळेच संपणार आहेत, हे यांना कळत नसेल का?) ब्रिटिश त्यांचे आदर्श आहेत, त्यांनी दिलेला ‘फोडा आणि राज्य करा’ हा मंत्र ते मनापासून पाळत आहेत. त्यामुळे जातीपातीत समाजाचं विभाजन करणं हे त्यांचं आद्य कर्तव्य आहे आणि त्याचं आद्य केंद्र बारामतीत आहे.

सावरकर, तुम्ही लेखण्या मोडून बंदुका हाती घ्यायला सांगितल्या कारण ती त्या काळाची गरज होती. सैनिकीकरणाच्या पुरस्कारासाठी तुम्ही तुमची लेखणी आणि वाणी तलवारीसारखी चालवली. ब्रिटिशांचे रिक्रूटवीर म्हणून हिणवलं जाऊनही, सावरकर तुम्ही केलेल्या हिंदूंच्या सैनिकीकरणामुळे फाळणी नंतर हिंदुस्थानचं अस्तित्व, आपलं साहित्य टिकू शकलं, बहरू शकलं. पण म्हणून का तुम्हाला त्यांनी साहित्य संमेलनात स्थान द्यायचं?

भलेही तुम्ही प्रज्ञावंत लेखक आहात, महाकवी आहात, नाटककार आहात, वक्ता दशसहस्रेषु आहात, असेल तुमचं साहित्य क्षेत्रातील योगदान, तरी त्यांना तुम्ही साहित्य संमेलनातच काय कुठेच नको आहात, कारण तुम्ही हिंदुत्ववादी आहात. बहुसंख्य (?) हिंदूंच्या या देशात हिंदुत्ववादी असणं हे पाप आहे. तुमचे विचार अधिकाधिक लोकापर्यंत पोहोचू लागले तर ‘गजवा ए हिंद’ (Ghazwa e Hind) चं स्वप्न चक्काचूर होऊन इथे हिंदुराष्ट्र (Hindu Rashtra) होईल या भीतीनेच ते तुम्हाला विरोध करतात. आणि म्हणूनच साहित्य संमेलनातच काय इतर कुठेही तुम्हाला मान मिळणार नाही हे आता आम्हाला कळून चुकले आहे.

अर्थात तुम्हाला कसलीच अपेक्षा नसली तरी या देशात तुमचा सन्मान होण्याऐवजी अपमानच होतो याची आम्हाला खंत आहे. पण एक दिवस निश्चितच असा येईल की, हा देश पूर्णपणे तुमच्या विचारांवर चालेल आणि समर्थ हिंदू राष्ट्र निर्माण होईल. (Veer Savarkar)

(लेखिका स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्ष आहेत.)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.