Crime : राज्यात २०२१ – २०२३ या वर्षांत २० हजार महिला आणि १२ हजार बालकांवर अत्याचार

88
Crime : राज्यात २०२१ - २०२३ या वर्षांत २० हजार महिला आणि १२ हजार बालकांवर अत्याचार
Crime : राज्यात २०२१ - २०२३ या वर्षांत २० हजार महिला आणि १२ हजार बालकांवर अत्याचार

राज्यात महिला आणि बालकांवरील अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. २०२१-२२ या वर्षात एक लाख लोकसंख्येमागे ६६ तर २०२२-२३ या वर्षात ७६ महिलांवर अत्याचार झाल्याचे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. त्यानुसार, तीन वर्षात २० हजार ५५९ महिला तर १२ हजार ८९ बालकांवर बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. (Crime)

मागील तीन वर्षाच्या मिळालेल्या माहितीनुसार, २०२१ मध्ये ३९ हजार ५२६, २०२२ या वर्षामध्ये ४५ हजार ३३१ तर २०२३ मध्ये ४७ हजार ३८१ महिला अत्याचारांच्या गुन्ह्यांची नोंद झाली आहे. तसेच राज्यात महिलांसोबत बालकांवरील गुन्ह्यांत वाढ होत असून २०२१ मध्ये १७ हजार २३२, २०२२ या वर्षात २० हजार ७६२ तर २०२३ मध्ये २१ हजार ८०२ बालकांवर अत्याचार झाल्याच्या गुन्ह्यांची नोंद झाली होती. (Crime)

राज्यात दोषसिद्धीचे प्रमाण कमी

दरम्यान राज्यात महिला अत्याचाराची अनेक प्रकरणे घडत असताना गुन्ह्यातील दोषसिद्धीचे प्रमाण केवळ ३४.३ टक्के आहे. हेच प्रमाण देशात ३६.६ टक्के आहे. त्यामुळे राज्यात सर्वच गुन्ह्यांच्या बाबतीत सरासरी दोषसिद्धीचे सर्वाधिक प्रमाण मुंबईत ५४ टक्के आहे. मात्र महिलांविषयक गुन्ह्यांच्या प्रकरणात हे प्रमाण २६.२ टक्के आहे. तसेच पुण्यात (Pune) दोषसिद्धीचे प्रमाण १९.२ टक्के, तर नागपुरात (Nagpur) सर्वात कमी १०.८ टक्के एवढे आहे. (Crime)

राज्यात सध्या २ लाख १५ हजारांवर महिलांविषयक गुन्ह्यांची प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत. त्यापैकी १ लाख ७८ हजार प्रकरणे महिलांवरील झालेल्या अत्याचाराशी संबंधित आहेत. १० हजार ९०० गुन्ह्यांमध्ये न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यापूर्वीच तडजोड झाली. १२ हजार ३०० प्रकरणांत महिला तक्रारदारांनी न्यायालयातून माघार घेतली. (Crime)

राज्यात २०२१ ते २०२३ या वर्षात महिलांवरील अत्याचाराचे किती गुन्ह्यांची नोंद

२०२१ या वर्षात राज्यात महिलांवरील अत्याचाराचे अनेक गुन्हे नोंदवले गेले. त्यात अत्याचाराचे ५,९५४ गुन्हे , अपहरणाचे ७,५५९ गुन्हे, हुंडाबळीच्या १७२, घातक कृत्याचे १०,०९५ गुन्हे, विनयभंगाचे १२, ९४५ गुन्हे, अनैतिकतेसंदर्भात ९५ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. तसेच २०२२ या वर्षात राज्यात महिलांवरील अत्याचाराचे ७,०८४ गुन्हे, अपहरणाचे ९,२९७ गुन्हे, हुंडाबळीचे १८० गुन्हे, घातक कृत्याचे ११,४३४ गुन्हे, विनयभंगाचे १४,४२४ गुन्हे आणि अनैतिकतेचे ६५ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. त्याचबरोबर २०२३ या वर्षात राज्यात महिला अत्याचाराचे ७,५२१, अपहरणाचे ९,६९८ गुन्हे, हुंडाबळीचे १६९ गुन्हे, घातक कृत्याचे ११,२२६ गुन्हे, विनयभंगाचे १७,२८१ गुन्हे आणि अनैतिकतेचे १७४ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. (Crime)

राज्यात बालकांशी संबंधित गुन्हे

२०२१ ते २०२३ या तीन वर्षात राज्यात ३५४ बालकांचा खून झाला. वर्ष २०२१ मध्ये १४६, २०२२ मध्ये १२४ तर २०२३ मध्ये ८४ बालकांच्या खुनाच्या घटना घडल्या आहेत. तसेच २०२१ मध्ये बालकांच्या अत्याचाराचा ३,४५८ गुन्हे, अर्भक हत्येचे ०५, भ्रुणहत्येचे ६, पळवून नेण्याचे ९,५५५ तर त्याग करण्याच्या १३२ घटना घडल्या. २०२२ मध्ये बालकांच्या अत्याचाराचे ४,१८२ गुन्हे, अर्भक हत्येचे २५, भ्रुणहत्येचे १७ गुन्हे, पळवून नेण्याचे ११,५७१ गुन्हे, त्याग करण्याचे १४३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. २०२३ मध्ये ४,४४९ गुन्ह्यांची अर्भक हत्येचे ०६ गुन्हे, भ्रुणहत्येचे ०४ गुन्हे, पळवून नेण्याचे १२,५६४ गुन्हे आणि त्याग करण्याचे ४७ गुन्ह्यांची नोंद करण्यात आले आहेत. (Crime)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.