‘थर्टी फस्ट’च्या पार्टीत व्यभिचाराला प्रोत्साहन; पुण्यातील पबकडून Condom च्या पाकिटांचे वाटप

बरेच मुले-मुली थर्टी फस्टच्या पार्टीमध्येच पहिल्यांदा दारूचे सेवन करतात किंवा अमली पदार्थांचे सेवन करतात. त्यामुळे थर्टी फस्टची पार्टी म्हणजे व्यसनाधीनता आणि अनैतिक संबंध वाढण्याला कारणीभूत ठरत आहेत.

242

देशभरात सध्या जागोजागी थर्टी फस्टच्या पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले आहे. यातील बऱ्याच पार्ट्यांमध्ये अमली पदार्थांचे सेवन करण्यात येते, आता तरुणाईमध्ये शारीरिक संबंधही होत असतात, ही बाब इतकी सामान्य झाली आहे की, आता थर्टी फस्टच्या पार्ट्यांचे आयोजन करणारे पबने पार्टीसाठी येणाऱ्या तरुणाईला कंडोम (Condom) आणि शक्तीवर्धक ओआरएसचे पाकीट दिली आहेत.

पुण्यातील मुंढवा परिसरात असणाऱ्या हाय स्पिरीट या पबकडून नववर्षासाठी आयोजित पार्टीच्या निमंत्रितांसाठी या दोन वस्तू दिल्या आहेत. तरुणांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी आम्ही सुरक्षेच्या आयुधांमध्ये कंडोम (Condom) आणि ओआरएसचे पाकीट देणार असल्याचा दावा या पबने केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी चौकशी सुरू केली असून या पार्टीसाठी येणाऱ्या लोकांचे जबाब सुद्धा नोंद केले आहेत. या पब व्यव्यस्थापकाकडून पोलिसांनी याची माहिती घेतली आहे.

(हेही वाचा Unauthorized Hawkers वर कारवाई करणाऱ्या महापालिका पथकावर मुसलमानांचा हल्ला; महापौरांनी थेट बांगलादेशी घुसखोरांच्या घरावर बुलडोजर फिरवला)

हे कृत्य पुणे शहराच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक परंपरेला न शोभणारे आहे. अशा कृतींमुळे तरुणांमध्ये चुकीचे संदेश पोहोचण्याची भीती असून, समाजात गैरसमज आणि चुकीच्या सवयी रुजण्याचा धोका आहे. वास्तविक सध्या तरुणाईमध्ये मोठ्या प्रमाणावर शारीरिक संबंध वाढले आहेत. तरुणाईमध्ये वाढलेल्या वासनांधतेमुळे महिलांवरील अत्याचारात वाढ झालेली आहेच, तसेच महिलांमध्ये अनैतिक व्यवहार वाढलेले आहेत. यावर नियंत्रण आणण्याची गरज बनली असताना दुसरीकडे पुण्यातील हाय स्पिरीटसारखे पब जर थर्टी फस्टसाठी येणाऱ्या तरुणांना कंडोमची (Condom) पाकिटे वाटत असतील तर तरुणाईला ते अनैतिक शरीर संबंध ठेवण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत. खरे तर तरुणांमध्ये संयम निर्माण करणे आज काळाची गरज बनली असताना पुण्यातील हाय स्पिरीट सारखे पब तरुणाईला याच चुकीच्या गोष्टींना प्रोत्साहन देत आहेत.

नवरात्रोत्सवातही कंडोमची (Condom) पाकिटे वितरित केली जात असल्याचे प्रकरण आधीच घडली होती. त्यामुळे हा अत्यंत गंभीर विषय बनला आहे. थर्टी फस्टच्या पार्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांचे सेवन होत असते. त्याचे अवैध वितरण केले जाते. त्यामुळे बरेच मुले-मुली थर्टी फस्टच्या पार्टीमध्येच पहिल्यांदा दारूचे सेवन करतात किंवा अमली पदार्थांचे सेवन करतात. त्यामुळे थर्टी फस्टची पार्टी म्हणजे व्यसनाधीनता आणि अनैतिक संबंध वाढण्याला कारणीभूत ठरत आहेत.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.