Shivaji Park मधील लाल माती काढण्याचा निर्णय तज्ज्ञांच्या अभ्यास अहवालानंतरच!

267
Shivaji Park मधील लाल माती काढण्याचा निर्णय तज्ज्ञांच्या अभ्यास अहवालानंतरच!
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील (Shivaji Park) लाल मातीमुळे होणारे धुळीचे प्रदूषण रोखण्यासाठी मैदानातील लाल मातीचा थर काढण्यात येणार असल्याचे बोलले जात असले तरी प्रत्यक्षात महापालिका आयुक्तांनी यासाठीचा अभ्यास केल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल असे स्पष्ट केले आहे. आयुक्तांनीच याबाबतच्या फाईलवर आयआयटीचा अहवाल सादर केला जावा अशा शेरा मारल्याने या आयआयटीचा अहवाला आल्यानंतरच यावर निर्णय घेतला जाणार हे आता स्पष्ट होत आहे. त्यामुळे ‘आयआयटी’ या मैदानातील लाल माती काढायला लावते की यावर पाण्याचा सतत शिडकावा करायला लावून आतील परिसर हरित करण्याच्या सूचना करते याकडे सर्वांचे लक्ष आहे.

(हेही वाचा – देशात राष्ट्रीय दुखवटा; मात्र Rahul Gandhi परदेशात नववर्ष साजरे करणार)

मुंबईत प्रदुषणाची पातळी वाढत असतानाच दादर छत्रपती शिवाजी महाराज मैदानातील अर्थात शिवाजी पार्कमधील (Shivaji Park) लाल मातीमुळे होणाऱ्या धुळीचा त्रास स्थानिकांना होत आहे. यातच या मैदानातील धुळीचा त्रास करण्यासाठी मातीचा वरचा थर काढण्यात येणार आहे. यामुळे या थराखालील रेतीमिश्रित मातीचा थर वर येणार असल्याने धुळ उडण्याचे प्रमाण कमी होणार आहे. शिवाय धूळ प्रदtषण कमी करण्यासाठी क्रिकेट पिपच्या केअरटेकरनाही सभोवतालच्या भागात पाईपने पाणी मारण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे वृत्त अनेक वृत्तपत्रांनी प्रकाशित केले होते. याबाबत मुंबई महानगरातील हवेची गुणवत्ता या विषयाच्या अनुषंगाने आयोजित पत्रकार परिषदेमध्ये मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शिवाजी पार्कवरील (Shivaji Park) लाल मातीचा थर काढण्याचा निर्णय अभ्यास करून घेतला जाईल असे स्पष्ट केले. या मैदानावर सुमारे ९ सेंटीमीटरचा लाल मातीचा थर असून त्या लाल मातीचा थर हटवायचा की नाही याचा निर्णय अभ्यास करून घेतला जाईल, असे गगराणी यांनी स्पष्ट केले.

(हेही वाचा – खासदार Ravindra Waikar यांच्या गाडीचा अपघात; मद्यधुंद टेम्पोचालकाची कारला धडक)

मागील आठवड्यात याबाबतचा प्रस्ताव अतिरिक्त आयुक्त (शहर) यांच्याकडे सादर केला होता, परंतु त्यानंतर पुढील निर्णय घेण्यासाठी आयुक्त डॉ. भूषण गगराणी यांच्याकड सादर करण्यात आला. त्यानंतर आयुक्तांनी, या फाईलवर स्वाक्षरी करण्याऐवजी तज्ज्ञांचा अभ्यास म्हणजे आयआयटीचा अहवाल सोबत जोडला जावा असा शेरा मारून ही फाईल परत पाठवली आहे. त्यामुळे आता लाल माती काढण्यासाठी आयआयटीच्या तज्ञ समितीचा सल्ला घेऊन याचा अहवाला प्राप्त झाल्यानंतरच पुढील कार्यवाही केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आयआयटी नेमका काय सल्ला देते याकडे सर्वांचे लक्ष आहे. (Shivaji Park)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.