Bangladeshi Intruders : मुंबईत ४१३ घुसखोर बांगलादेशी नागरिकांवर कारवाई; १६३ घुसखोर हद्दपार

115
Bangladeshi Intruders : मुंबईत ४१३ घुसखोर बांगलादेशी नागरिकांवर कारवाई; १६३ घुसखोर हद्दपार
  • प्रतिनिधी 

मुंबईसह राज्यभरात घुसखोर बांगलादेशींविरुद्ध मोहीम सुरू करण्यात आली आहे. मुंबईत घुसखोरी करून बेकायदेशीररित्या राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांना मुंबईतील वेगवेगळ्या पोलीस ठाणे, तसेच विशेष शाखेच्या पथकाने १ जानेवारी ते १ डिसेंबर २०२३ या कालावधीत ४१३ घुसखोर बांगलादेशी नागरिकांवर कारवाई केली आहे. यापैकी मुंबई पोलिसांच्या विशेष शाखा-१ ने १६३ घुसखोर बांगलादेशी नागरिकांना हद्दपार करण्यात आले आहे. (Bangladeshi Intruders)

भारतात बांगलादेशी नागरिकांची घुसखोरी मोठ्या प्रमाणात वाढली असून वाढत्या बांगलादेशी घुसखोरीमुळे सरकारची डोकेदुखी वाढली आहे. चोरट्या मार्गाने भारतात घुसखोरी करणाऱ्या प्रत्येक घुसखोर बांगलादेशींना भारतात चोरट्या मार्गाने आणून त्यांना भारतात वेगवेगळ्या शहरामध्ये पाठविण्यासाठी दलालांची मोठी टोळी काम करीत आहे. (Bangladeshi Intruders)

(हेही वाचा – Jitendra Awhad यांचा मुंडेंविरोधात एकच राग; माझ्याविरोधात प्रचाराला का आला? न्याय वगैरे फक्त बनाव; ऑडिओ क्लिप व्हायरल)

मुंबई तसेच नवी मुंबई आणि ठाणे शहरामध्ये पसरलेल्या झोपडपट्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घुसखोर बांगलादेशीयांचे वास्तव्य आहे. या घुसखोरांवर मुंबई पोलिस आणि इतर तपास यंत्रणांकडून नियमित कारवाई करण्यात येत असते. मुंबईतील वेगवेगळ्या पोलीस ठाण्याकडून १ जानेवारी ते १ डिसेंबर २०२३ या कालावधीत जवळपास २५० घुसखोर बांगलादेशी नागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यापैकी अनेकांवर बनावट कागदपत्रे बाळगल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले असून काही जणांना भारतातून हद्दपार करण्यात आले आहे. (Bangladeshi Intruders)

मुंबई पोलिसांची विशेष शाखा-१ यांच्या बांगलादेशी हद्दपार कक्षाने १ जानेवारी ते १ डिसेंबर २०२३ या कालावधीत १६३ घुसखोर बांगलादेशी नागरिकांना भारतातून हद्दपार केले आहे. त्यामध्ये १४३ पुरुष, १७ महिला आणि ३ अल्पवयीन आहेत. यातील सहा जणांना अनैतिक तस्करी प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीआयटीए) वर्षभरात प्रत्यार्पण करण्यात आले. (Bangladeshi Intruders)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.