ख्रिस्ती बनलेल्या ६५१ कुटुंबांची Hindu धर्मात घरवापसी

243
प्रतिकात्मक छायाचित्र

छत्तीसगड येथे ६५१ ख्रिस्ती कुटुंबे हिंदू (Hindu) धर्मात परतले आहेत. ही कुटुंबे सुरुवातीला हिंदू होती, पण काही कारणांमुळे त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला. प्रबल प्रताप सिंह जुदेव यांनी या कुटुंबांची हिंदू धर्मात घरवापसी केली. त्यांची कुटुंबे दोन पिढ्यांपासून या कार्यात गुंतले असून हजारो कुटुंबांना त्यांनी सनातनमध्ये परत आणले आहे.

(हेही वाचा ‘थर्टी फस्ट’च्या पार्टीत व्यभिचाराला प्रोत्साहन; पुण्यातील पबकडून Condom च्या पाकिटांचे वाटप)

शक्ती येथे आयोजित या विशाल हिंदू परिषदेत भाजप नेते प्रबल प्रताप सिंह जुदेव यांनी या कुटुंबांचे पाय धुतले. या कार्यक्रमात साध्वी प्रज्ञासह अनेक हिंदू (Hindu) संत सहभागी झाले होते. येथे ते हिंदू कामगारही सामील झाले, ज्यांना ख्रिश्चन बनण्याचे आमिष दाखवले गेले. इथेही त्यांचा मान होता. या कार्यक्रमात प्रबल प्रताप सिंह जुदेव म्हणाले, “सनातन संस्कृतीला सर्वात मोठा धोका छद्म हिंदूंपासून आहे. आपल्या हिंदू (Hindu) समाजात राहणारे हे क्रिप्टो ख्रिश्चन फसव्या पद्धतीने धर्मांतराला प्रोत्साहन देतात आणि स्लीपर सेलसारखे काम करतात. त्यांचा पर्दाफाश करणे आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करणे अत्यंत आवश्यक आहे.”

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.