‘आप’ने दिल्लीत रोहिंग्यांना वसवले; भाजपाचा Arvind Kejriwal यांच्या आमदारांवर आरोप

69
'आप'ने दिल्लीत रोहिंग्यांना वसवले; भाजपाचा Arvind Kejriwal यांच्या आमदारांवर आरोप
'आप'ने दिल्लीत रोहिंग्यांना वसवले; भाजपाचा Arvind Kejriwal यांच्या आमदारांवर आरोप

आम आदमी पार्टीने (AAP) दिल्लीत अवैधरित्या रोहिंग्यांना वसवले असल्याचा गंभीर आरोप भाजपाने (BJP) केला आहे. अरविंद केजरीवाल यांनी अमित शाह आणि हरदीप पुरींकडे रोहिग्यांबाबत माहिती असल्याचे म्हटले होते. त्यानंतर भाजपाने हा आरोप केला आहे.

( हेही वाचा : बांगलादेशी, रोहिंग्यांना भारतीय बनविण्याचे केंद्र ठरतेय मालेगाव; Kirit Somaiya यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली चौकशीची मागणी)

आम आदमी पक्षाचे(AAP) संयोजक अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी पत्रकार परिषदेत भाजपावर याच मुद्द्यावरुन आरोप केला. ते म्हणाले की, हरदीप सिंग पुरी (Hardeep Singh Puri) यांना अटक करण्यात यावी. रोहिंग्यांना कुठे आणि कसे स्थायिक केले याची सर्व माहिती हरदीप सिंग पुरी यांच्याकडे असल्याचा दावा केजरीवाल यांनी केला. हरदीप सिंग पुरी आणि अमित शहा यांच्याकडे रोहिंग्या संबंधीची सर्व माहिती असल्याचा दावा केला. (BJP)

यासंदर्भात केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते हरदीप सिंग पुरी (Hardeep Singh Puri) म्हणाले की, केजरीवाल (Arvind Kejriwal)यांच्या आमदाराने रोहिंग्यांना दिल्लीत स्थायिक होण्यास मदत केली आणि त्यांना मोफत रेशन, पाणी, वीज आणि मतदार कार्ड दिले. हरदीप पुरी यांनी ट्वीटरवर (एक्स) संदेश जारी करत हा आरोप केला आहे. पुरी म्हणाले की, खोट्याची पुनरावृत्ती केल्याने ते खरे होत नाही. कोणत्याही रोहिंग्या निर्वासिताला ईडब्ल्यूएस फ्लॅट मिळालेले नाहीत. रोहिंग्या कोणत्या पक्षाचे मतदार आहेत हे सर्वांना माहीत आहे. रोहिंग्यांना वारंवार समर्थन करणे म्हणजे देशाच्या सुरक्षेशी खेळण्यासारखे असल्याचे पुरी यांनी नमूद केले. तसेच आपने दिल्लीत रोहिंग्याना वसवण्यास मदत केली, असा गंभीर आरोपही त्यांनी केला. (BJP)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.