Mhada मुख्यालयातील सुरक्षा होणार अधिक कडक

648
म्हाडा (Mhada) मुख्यालयात गेल्या आठवड्यात झालेल्या गैरवर्तनाचा प्रसंग व महिला कर्मचाऱ्याशी अपशब्द वापरून केलेला अपमान या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी म्हाडातील संघटनांनी मुंबईसह राज्यातील विविध गृहनिर्माण मंडळांत सोमवारी लेखणी बंद आंदोलनाची हाक दिली होती. म्हाडा मुख्यालयात सोमवारी सकाळी जमलेल्या कर्मचाऱ्यांना म्हाडा उपाध्यक्ष  संजीव जयस्वाल हे सामोरे  जावूया त्यांनी हे आंदोलन मागे घेण्यास भाग पाडले. भविष्यात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी योग्य ती पावले उचलली जातील. भविष्यात कार्यालयात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी अधिक सुरक्षा वाढवण्यात येणार आहे. कर्मचारी व नागरिकांमधील परस्पर आदर कायम राहावा यासाठी दक्षता पाळली जाईल. सरकारी कामात अडथळा आणणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या वर्तनाविरोधात कठोर कारवाई केली जाईल,असे संजीव जयस्वाल यांनी आश्वासन दिले.
IMG 20241230 WA0251 scaled
म्हाडातील (Mhada)अधिकारी व महिला कर्मचाऱ्याशी झालेल्या गैरवर्तनाच्या घटनेनंतर, महाराष्ट्र गृहनिर्माण कर्मचारी संघटना, म्हाडा मागासवर्गीय कर्मचारी संघटना आणि ग्रॅज्युएट इंजिनियर्स असोसिएशन ऑफ म्हाडा या संघटनांनी सोमवारी कोणतेही काम न करण्याचा निर्णय लेखणी बंद या आंदोलनाद्वारे जाहीर केला होता. म्हाडा मुख्यालयाच्या प्रांगणात निषेध नोंदविण्यासाठी शेकडो कर्मचारी सकाळी काळ्या फिती लावून मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी कर्मचाऱ्यांशी बोलतांना म्हाडा उपाध्यक्ष  संजीव जयस्वाल यांनी संगितले की, म्हाडा (Mhada) हे एक लोकाभिमुख कार्यालय आहे व नागरिकांची सेवा हेच आपले सर्वांचे मुख्य उद्दिष्ट आहे. दररोज अनेक नागरिक विविध कामासाठी म्हाडाला भेट देत असतात. अशा परिस्थितीत त्यांना वेठीस धरणे योग्य नसल्याने संघटनांनी पुकारलेला लेखणी बंद आंदोलन मागे घ्यावे असे आवाहन या प्रसंगी केले. तसेच ते पुढे म्हणाले की, अशा घटनांमुळे आपल्याला आपल्या जबाबदाऱ्या थांबवता येणार नाहीत. मात्र, तितक्याच उत्स्फूर्तपणे अधिकाधिक नागरिकांना न्याय मिळवून देण्याचे कार्य त्यांच्याकडून होणार असल्याची हमी त्यांनी या प्रसंगी दिली.
घडलेल्या प्रकाराबाबत कर्मचाऱ्यांना आश्वस्त करत, जयस्वाल यांनी यापुढे लोकसेवेचे कार्य करीत असताना सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला. तसेच, भविष्यात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी योग्य ती पावले उचलली जातील. भविष्यात कार्यालयात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी अधिक सुरक्षा वाढवण्यात येणार आहे. कर्मचारी व नागरिकांमधील परस्पर आदर कायम राहावा यासाठी दक्षता पाळली जाईल. सरकारी कामात अडथळा आणणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या वर्तनाविरोधात कठोर कारवाई केली जाईल. याप्रसंगी नागरिकांसाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अशा प्रकारचे वर्तन होणे हे अस्वीकार्य असल्याचे कर्मचारी वर्गाने स्पष्ट केले. त्यांनी दिवसभर काम करत असतानाच काळ्या फिती लावून आपला निषेध नोंदवला आणि नागरिकांच्या सेवेसाठी पुन्हा आपले काम सुरू केले. (Mhada)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.