Santosh Deshmukh Case : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा सीआयडीच्या ९ पथकांकडून तपास; आरोपी फरारच

95
Santosh Deshmukh Case : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा सीआयडीच्या ९ पथकांकडून तपास; आरोपी फरारच
Santosh Deshmukh Case : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा सीआयडीच्या ९ पथकांकडून तपास; आरोपी फरारच

बीड (Beed) जिल्ह्यातील मस्साजोग (Massajog ता. केज) येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणानंतर राज्यभर संताप व्यक्त होत आहे. बीड जिल्ह्यातील राजकारणही ढवळून निघाले आहे. संशयित वाल्मीक कराड, सुदर्शन घुलेसह चार फरार आरोपींच्या शोधासाठी सीआयडीची नऊ पथके आणि १५० पेक्षा जास्त अधिकारी, कर्मचारी नियुक्त केले आहेत. देशभर शोध सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे; मात्र हत्येला २२ दिवस उलटूनही हे आरोपी सापडलेले नाहीत. (Santosh Deshmukh Case)

(हेही वाचा – Manipur मध्ये २ दहशतवाद्यांना अटक; मोठा शस्त्रसाठाही जप्त)

संतोष देशमुख हत्या, तसेच दोन कोटी रुपयांची खंडणी या प्रकरणांत फरार असलेला आरोपी वाल्मीक कराड (Walmik Karad) पुण्यात शरण आल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र ही बातमी खोटी असून कराड याचा शोध घेण्यात येत असून, तो शरण आलेला नाही, अथवा अद्याप त्याला अटकदेखील करण्यात आली नसल्याची माहिती सीआयडीच्या सूत्रांनी दिली.

फरार आरोपींची मालमत्ता जप्त करणार

सरपंच हत्या प्रकरणात सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे तिघे जण फरार आहेत. तर दोन कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात वाल्मीक कराड मोकाट आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फरार आरोपींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश सीआयडीला दिले होते. त्याप्रमाणे त्यांनी न्यायालयात पत्र देऊन जप्तीची कार्यवाही सुरू केली आहे. त्यासाठी महसूल आणि उपनिबंधक कार्यालयाला पत्रही दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

मृत सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी तपासाची माहिती घेण्यासाठी सोमवारी दुपारी सीआयडी अधिकाऱ्यांची भेट घेतली. वाल्मीक कराडवर तब्बल १५ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. असे असतानाही त्याच्याकडे शस्त्र परवाना होता. एवढेच नव्हे, तर गुन्हा दाखल होईपर्यंत दोन पोलीस बॉडीगार्डही होते. त्यामुळे पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे, असे ते म्हणाले. (Santosh Deshmukh Case)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.