शहरातील रस्ते कामाची ACB कडे तक्रार, नार्वेकर यांची चौकशी करण्याची मागणी

1049
BMC : बोरीवली, भायखळ्यातील बांधकामांना पुन्हा सुरुवात, महापालिकेने उठवली स्थगिती
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

भाजपचे माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर (Makarand Narwekar) यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला (ACB) पत्र लिहून दक्षिण मुंबईतील सिमेंट काँक्रीट (Cement Concrete) रस्ते प्रकल्पाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. दक्षिण मुंबईत सीसी रस्त्याचे काम अद्याप सुरू झालेले नाही, त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. हे कंत्राट अंदाजपत्रकापेक्षा ४ टक्के अधिक दराने देऊनही कामाला सुरुवात झालेली नाही. वारंवार स्मरणपत्रे देवूनही करूनही बीएमसीचा रस्ता विभाग प्रतिसाद देत नाही. यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रस्ते विभागाचे अधिकारी आणि संबंधित कंत्राटदाराविरुद्ध प्राथमिक चौकशी केली पाहिजे, अशी मागणी नार्वेकर (Makarand Narwekar) यांनी केली आहे.

एसीबीचे अतिरिक्त आयुक्त संदिप दिवाण यांना लिहिलेल्या पत्रात ऍड. मकरंद नार्वेकर (Makarand Narwekar) यांनी सार्वजनिक निधीचा दुरुपयोग आणि प्रकल्पातील प्रगतीचा अभाव याकडे लक्ष वेधले आहे. नार्वेकर यांनी निदर्शनास आणून दिले की M/s NCC Ltd ला सप्टेंबर २०२४ मध्ये १,३०० कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले होते, जे अंदाजापेक्षा ४ टक्के (७५ कोटी रुपये) जास्त होते. सुरुवातीला, M/s NCC Ltd ला अंदाजित रकमेपेक्षा ९ टक्के जास्त दराने कंत्राट दिले जात होते. यामुळे सरकारी तिजोरीचे १५० कोटी रुपयांचे नुकसान झाले असते. परंतु, मी मुद्दा उपस्थित केल्यानंतर, ते ४ टक्के पर्यंत कमी करण्यात आले. त्यावेळेला मी अशी मागणी केली होती की, कंत्राट हे मुंबईतील इतर कंत्राटाप्रमाणे अंदाजित रकमेच्या दराने दिला जावा आणि अंदाजापेक्षा जास्त नाही, असेही नार्वेकर म्हणाले.

(हेही वाचा – New Year 2025 : वरळी, लोअर परेल आणि महालक्ष्मी भागांतील पब, रेस्टोबार, रेस्टॉरंटची झाडाझडती; ६ रेस्टॉरंटवर कारवाई)

दक्षिण मुंबईतील रस्त्यांच्या दुरवस्थेवर सातत्याने प्रकाश टाकणारे नार्वेकर पुढे म्हणाले की, दक्षिण मुंबईत सीसी रस्त्याचे काम अद्याप सुरू झालेले नाही, त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. हे कंत्राट अंदाजपत्रकापेक्षा ४ टक्के अधिक दराने देऊनही कामाला सुरुवात झालेली नाही. वारंवार स्मरणपत्रे देवूनही करूनही बीएमसीचा रस्ता विभाग प्रतिसाद देत नाही. शहरातील सीसी रोड प्रकल्प ७,००० कोटी रुपयांचा असल्याचे सांगितले जाते. कामाचा दर्जा निकृष्ट आणि नव्याने बांधण्यात आलेल्या सीसी रस्त्यांना खड्डे पडल्याबद्दलही रहिवासी तक्रारी करत आहेत, याकडेही नार्वेकर यांनी त्यांच्या पत्रात नमूद केले आहे.

नार्वेकर (Makarand Narwekar) यांनी पुढे निदर्शनास आणून दिले की, अभिजित बांगर, अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) यांच्या नेतृत्वातील रस्ते विभाग दक्षिण मुंबईतील सीसी रस्त्यांचे कंत्राट अंदाजपत्रकापेक्षा ४ टक्के अधिक दराने देण्यास आग्रही असल्याचे दिसत होते.

(हेही वाचा – Arunachal Pradesh सरकार अवैध धर्मांतराला आळा घालणार; आता लागू होणार ‘हा’ कायदा)

चार महिने उलटून गेले तरी प्रत्यक्षात जमिनीवर कोणतेही काम न झाल्याने अभिजित बांगर यांच्या नेतृत्वाखालील रस्ते विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रस्ते विभागाचे अधिकारी आणि संबंधित कंत्राटदाराविरुद्ध प्राथमिक चौकशी केली पाहिजे. हा मुद्दा सार्वजनिक हिताशी संबंधित आहे. मला आशा आहे की एसीबी याची दखल घेईल आणि चौकशी करेल, असे नार्वेकर यांनी सांगितले.

जानेवारी २०२३ मध्ये, महापालिकेने सुरुवातीला रोडवे सोल्युशन्स इंडिया इन्फ्रा लिमिटेड (RSIIL) ला शहरातील आठ प्रभागांमधील २१२ रस्त्यांचे काम करण्यासाठी कंत्राट दिले होते. परंतु, अपुऱ्या प्रगतीमुळे १६८७ कोटी रुपयांचा करार ८ नोव्हेंबर २०२३ रोजी संपुष्टात आणला. त्यानंतर RSIIL ला ६४.६ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. मात्र हा दंड महापालिकेने अद्यापपर्यंत वसूल केला आहे, असे दाखवणारा करणारा कोणताही पुरावा नाही, असे नार्वेकर यांनी नमूद केले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.