Thirty First Party : अपघात रोखण्यासाठी बार, पबच्या बाहेर पोलीस तैनात

84
Thirty First Party : अपघात रोखण्यासाठी बार, पबच्या बाहेर पोलीस तैनात
  • प्रतिनिधी

थर्टी फर्स्टच्या रात्री रस्त्यावरील अपघात रोखण्यासाठी मुंबईतील बार, पब, आणि पार्टीच्या ठिकाणी पोलीस तैनात करण्यात येणार आहे. मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांना पोलिसांकडून जागेवरच आवर घालून त्यांना घरी सोडण्यासाठी रिक्षा, टॅक्सी चालकांची मदत घेतली जाणार आहे. प्रत्येक वर्षी थर्टी फर्स्टच्या रात्री आणि नवीन वर्षाच्या पहाटे मुंबईत मोठ्या प्रमाणात अपघात होतात. (Thirty First Party)

(हेही वाचा – Rishabh Pant तो फटका खेळला ती संघाची रणनीती की, ऋषभची एकट्याची चूक?)

अपघात रोखण्यासाठी मुंबईत वाहतूक विभाग आणि पोलीस ठाण्याकडून थर्टी फर्स्टच्या रात्रीच शहरात नाकाबंदी लावून मद्यधुंद अवस्थेत असलेल्या वाहन चालकांवर कारवाई करण्यात येत असली तरी, मद्यपान करून वाहने चालविणारे वाहन चालक पोलिसांच्या नाकाबंदीतून सुटण्यासाठी सुसाट वाहने चालवतात. त्यातून मोठे अपघात होण्याची शक्यता असल्यामुळे यंदाच्या वर्षी मुंबई पोलिसांनी या मद्यपी वाहन चालकांना रोखण्यासाठी बार, पब, तसेच पार्टीच्या ठिकाणांवर आपले लक्ष केंद्रित केले आहे. (Thirty First Party)

(हेही वाचा – Cyber Crime: App च्या मदतीने व्यावसायिकाची ३ कोटींची फसवणूक)

प्रत्येक बार, पब आणि पार्टीच्या ठिकाणाबाहेर पोलीस तैनात करण्यात येणार आहे. मद्यपान करून पार्टीच्या ठिकाणाहून बाहेर पडणाऱ्या वाहन चालकांना जागेवरच रोखण्यात येणार असून त्यांना मद्यपान करून वाहने चालविण्यास पोलिसांकडून मज्जाव करण्यात येणार आहे. मद्यपी चालकांना त्यांच्या इच्छुक स्थळी सोडवण्यासाठी पोलिसांकडून रिक्षा, टॅक्सी, ओला, उबेर यांची मदत घेतली जाणार आहे. तसेच बार मालकांना मद्यपींना त्यांच्या वाहनातून घरी सोडवण्यासाठी वाहन चालकांची सोय करून द्यावी असे आवाहन पोलिसांकडून बार मालकांना करण्यात आले आहे. (Thirty First Party)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.