Chess Dress Code : बुद्धिबळ स्पर्धांना आता जीन्स घालण्यास परवानगी

Chess Dress Code : फिडेनं जीन्स घालायला परवानगी दिल्यावर कार्लसन स्पर्धेत परतला आहे.

83
Chess Blitz World Cup : कार्लसन, नेपोमिनियाची यांच्या संयुक्त विजेतेपदावर जगभरात टिकेची झोड
  • ऋजुता लुकतुके

अमेरिकेत सुरू असलेल्या बुद्धिबळ रॅपिड व ब्लिट्झ विश्वचषक स्पर्धेत शनिवारी खेळाडूंनी घालायच्या पेहरावावरून वाद निर्माण झाला होता. पण, फिडेनं जीन्स परिधान करण्याला दिलेल्या परवानगी नंतर हा वाद मिटला आहे आणि माजी जगज्जेता खेळाडू मॅग्नस कार्लसन सोमवारी जीन्स घालून स्पर्धेत परतलाही आहे. इथून पुढे जीन्सच परिधान करणार असल्याचंही त्याने सोमवारी पत्रकारांना सांगितलं. (Chess Dress Code)

५ वेळा जगज्जेता ठरलेला कार्लसन शुक्रवारी या स्पर्धेत जीन्स घालून स्पर्धेच्या ठिकाणी आला. त्यामुळे सुरुवातीला त्याच्यावर २०० अमेरिकन डॉलरा दंड ठोठावण्यात आला. त्यानंतर कार्लसनने जीन्स बदलण्याची विनंती मान्य केली. पण, पुढच्या दिवसापासून आपण जीन्स घालणं टाळू, त्यादिवशी जीन्सची परावानगी मिळावी, असा हट्ट त्याने धरला. (Chess Dress Code)

(हेही वाचा – शहरातील रस्ते कामाची ACB कडे तक्रार, नार्वेकर यांची चौकशी करण्याची मागणी)

आयोजक आणि फिडेनं पेहरावाच्या नियमांवरून ही परवानगी नाकारल्यावर कार्लसनने स्पर्धाच सोडली. त्यावर मोठा वाद निर्माण झाला होता. ‘खेळाडूंच्या स्थापन केलेल्या संघटनेनंच पेहरावाची आचार संहिता बनवल्याचं,’ फिडेनं नंतर स्पष्ट केलं होतं. तर या संघटनेचा उपाध्यक्ष विश्वनाथन आनंदने, ‘आम्ही आचारसंहिता पाळत होतो, कार्लसनने ती पाळली नाही,’ अशी टिप्रणी त्यावर केली होती. (Chess Dress Code)

कार्लसनने आनंदला तर उत्तर दिलंय. शिवाय जीन्स घालण्याचाच आग्रह कायम धरला. त्यानंतर फिडेनं आपले पेहरावाचे नियम काहीसे शिथील करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘शिष्टाचाराला धरून असलेले सुसंस्कृत कपडे चालतील,’ असं त्यांनी नवीन पत्रकात म्हटलं आहे. (Chess Dress Code)

(हेही वाचा – महिलांना नोकरी देणे बंद करा; अफगाणिस्तानात Taliban चा फतवा)

त्यामुळे चांगली आणि सभ्य दिसणारी जीन्स असेल तरी ती स्पर्धेच्या ठिकाणी चालेल, असा निर्वाळा फिडेनं दिल्यामुळे मॅग्नस कार्लसनचा रॅपिड विश्वचषकात खेळण्याचा मार्ग मोकळा झाला. ब्लिट्झ विश्वचषकात मॅग्नस कार्लसनने सोमवारी बाद फेरीत प्रवेश केला असून पुढील डावात तो निमनशी दोन हात करणार आहे. (Chess Dress Code)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.