Rishabh Pant : रिषभ पंतवर सोशल मीडियावर होतेय टीका

Rishabh Pant : मेलबर्न कसोटीत रिषभ पंतच्या बळीनंतर भारतीय डाव गुंडाळला गेला.

105
Rishabh Pant : रिषभ पंतवर सोशल मीडियावर होतेय टीका
  • ऋजुता लुकतुके

रिषभ पंत (Rishabh Pant) मेलबर्न कसोटीच्या पाचव्या दिवशी ज्या पद्धतीने बाद झाला, त्यामुळे त्याच्यावर टीकेची झोड उठत आहे. ३ बाद ३३ नंतर रिषभ (Rishabh Pant) आणि यशस्वी यांनी ८९ धावांची भागिदारी रचत धावसंख्या ३ बाद १२२ वर नेली होती आणि कसोटी अनिर्णित राखण्यासाठी भारताला उर्वरित ४३ षटकं खेळून काढायची होती. अचानक चहापानानंतर दोन्ही भारतीय फलंदाज आपले फटके खेळायला लागले. यात जोखीम असते आणि ट्रेव्हिस हेडच्या दुसऱ्या षटकात अशी जोखीम रिषभ पंतने (Rishabh Pant) पत्करली. मेलबर्न या जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या मोठ्या मैदानावर रिषभने लाँग ऑनला षटकार खेचण्याचा प्रयत्न केला. तो अपयशी ठरला आणि त्याचा झेल उडाला.

रिषभ (Rishabh Pant) बाद झाल्यावर नवीन फलंदाज बॅकफूटवर गेले आणि बचावात्मक पवित्रा असताना बळी गमावण्याची शक्यताच जास्त असते. तसंच भारतीय फलंदाजांचं झालं. उर्वरित ६ बळी फक्त ३३ धावांची भर घालून तंबूत परतले आणि कसोटी, जी अनिर्णित राखता आली असती ती भारताने १८४ धावांनी गमावली.

(हेही वाचा – शहरातील रस्ते कामाची ACB कडे तक्रार, नार्वेकर यांची चौकशी करण्याची मागणी)

रिषभ पंतच्या त्या बेजबाबदार फटक्यावरून सोशल मीडियावर तो टीकेचा धनी झाला आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.