Air Pollution : मुंबईतील प्रदुषणकारी ७७ पाव बेकरी बंद

472
Air Pollution : मुंबईतील प्रदुषणकारी ७७ पाव बेकरी बंद
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

मुंबईतील अनेक पाव भट्ट्यांमध्ये लाकूड आणि कोळशाचा वापर केला जात असल्याने अशाप्रकारे प्रदुषणकारी ७७ बेकरी बंद करण्यात येत आहेत. यासाठीची कायदेशीर कारवाई करण्यात येत असल्याची माहिती महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. भूषण गगराणी यांनी दिली आहे. (Air Pollution)

मुंबईतील बेकऱ्यांच्या करण्यात आलेल्या या सर्वे अभ्यासात आजही बहुतांशी बेकरीच्या भट्टीमध्ये इंधन म्हणून लाकडाचा वापर करताना आढळून आले होते. ज्यामुळे हानीकारक अशा प्रदुषकांचे उत्सर्जन होते. यामध्ये पार्टिक्युलेट मॅटरश्, मिथेन, कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड आणि व्होलटाईल ऑर्गेनिक कंपाऊंड्स यासारख्या प्रदुषकांचा यामध्ये समावेश आहे. या उत्सर्जनामुळे मुंबईकरांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होत आहे. (Air Pollution)

(हेही वाचा – वाल्मिक कराड यांच्या अटकेनंतर Dhananjay Munde अडचणीत)

या सर्वेक्षण अभ्यास अहवालात २०० बेकरींपैंकी ४७.१० टक्के बेकरी या इंधन म्हणून प्रामुख्याने लाकडाचा वापर करतात. लॉगवूडच्या तुलनेत खूपच कमी खर्च असल्यामुळे जुन्या फर्निचरमधून मिळणारे लाकूड, जीर्ण, मोडकळीस आलेल्या इमारतींमधील लाकूड असे भंगार लाकूड हा या बेकरीच्या इंधनाचा प्राथमिक स्त्रोत आहे. यामुळे शहरातील हवा प्रदुषणाच्या पातळीत मोठी भर पडते. लाकडाचा वापर करणाऱ्या बेकरी दिवसाला सर्वसाधारणपणे सरासरी सुमारे १३० किलो लाकूड वापरतात. लाकडाचा वापर करणाऱ्या बेकरी या दिवसाला सुमारे २५० ते ३०० किलो दरम्यान लाकडाचा इंधन म्हणून वापर करतात असे त्यांनी या अहवालात नमुद केले आहे. (Air Pollution)

त्यामुळे मुंबईतील प्रदुषणकारी बेकरींवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (एमपीसीबी) सूचनेनुसार, कारवाई करण्यात येत असून आतापर्यंत प्रदूषणकारी ७७ बेकरी बंद करण्याच्या दृष्टीने कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. तसेच लाकूड/कोळसा आधारित एकूण ३५६ पाव भट्ट्यांना (Bakery) एका वर्षाच्या आत स्वच्छ इंधनावर (Clean Fuel) रूपांतरित केले जाणार असल्याचे महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. भूषण गगराणी यांनी स्पष्ट केले. (Air Pollution)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.