Vadhavan Port च्या पाणीपुरवठ्यासाठी ३२८ कोटींचा निधी मंजूर

83
Vadhavan Port च्या पाणीपुरवठ्यासाठी ३२८ कोटींचा निधी मंजूर
Vadhavan Port च्या पाणीपुरवठ्यासाठी ३२८ कोटींचा निधी मंजूर

वाढवण बंदरासाठी लागणाऱ्या पाण्याच्या सुधारित पाणीपुरवठा योजनेचा परिपूर्ण आराखडा तयार झाला आहे. या पाणीपुरवठा योजना प्रकल्पाचा खर्च ३२८ कोटी असून महाराष्ट्र जीवन प्रधिकरणामार्फत त्याला मान्यता देण्यात आली आहे. पाणीपुरवठा योजनेचा आराखडा महाराष्ट्र जीवन प्रधिकरणामार्फत तयार करण्यात आला असून त्याला तांत्रिक मान्यता देण्यात आली असून काही मान्यता प्रलंबित आहेत. (Vadhavan Port)

( हेही वाचा : BMC : मुंबईतील सर्व समुद्र चौपाट्यांसह गेटवे जवळ प्रखर प्रकाश व्यवस्था; स्वच्छतेसाठी ५ हजार कामगार तैनात

सुधारित पाणीपुरवठा योजनेनुसार कुर्झे धरणातून १५.२३ दशलक्ष घनमीटर इतके पाणी आरक्षित करण्यात आले आहे. बंदरासाठी ६.१८ दलघमी तर बंदराच्या वसाहतीसाठी ९.५ दलघमी पाणी आरक्षित करण्यात आले आहे. या आरक्षणाला जलसंधारण, जलसंपदा विभागाने (Water Resources Department) मान्यता दिली आहे. पाणीपुरवठा योजनेचा सविस्तर सुधारित प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे. ३२८ कोटी रुपयांची ही योजना तयार असून त्याला दि. १६ सप्टेंबर रोजी तिला तांत्रिक मान्यता देण्यात आली आहे. (Vadhavan Port)

विभागीय प्राधिकरण कार्यालयाकडे ६५ कोटींचा निधी वर्ग

योजनेच्या कामासाठी लागणाऱ्या आराखड्यासह इतर प्रशासकीय व तांत्रिक कामांसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे सामंजस्य करार करून त्याअंतर्गत ६५ कोटींचा पहिला हप्ता विभागीय प्राधिकरण कार्यालयाकडे वर्ग करण्यात आला आहे. वनजमिनीतून जाणाऱ्या जलवाहिनीची परवानगी प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यासाठी मागणी करण्यात आली आहे.

यासंदर्भात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अभियंत्यांनी सांगितले की, पाणीपुरवठा योजनेच्या २२४ कोटीची निविदा प्रक्रिया सुरू आहे. कुर्झे धरणातून पाणीपुरवठा योजनेसाठीचा निधी हा जवाहर नेहरू पोर्टने उपलब्ध करून दिला आहे. १३४.४२ कोटींची निविदा प्रक्रिया महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून प्रगतीत आहे. सध्या पहिल्या टप्प्याचे काम सुरू झाले आहे. वाढवण बंदरासाठी पाण्याच्या मागणीसाठी जवाहर नेहरू बंदर विकास प्राधिकरणाने (Jawaharlal Nehru Bandar Development Authority) कुर्झे धरणातील पाण्याची मागणी केली होती. त्यातील आरक्षण मागणी जलसंपदा विभागामार्फत मंत्रिमंडळात ३६ जिवंत साठ्यापैकी ४.५ दलघमी इतका पाणीसाठा देण्याला मंजुरी मिळाली आहे.(Vadhavan Port)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.